आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी कौशल्याने रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. मराठी सिनेसृष्टीत जवळपास दोन दशकं अक्षरशः लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावाने धुमाकूळ घातला. विनोदाचे अत्यंत अचूक टायमिंग असणारे लक्ष्मीकांत बेर्डे मराठी सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत आहेत. जरी ते आज हयात नसले तरी मराठी सिनेरसिकांच्या मनात कायम असतील. कारण त्यांना विसरणं कुणालाही शक्य नाही, असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही. साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या लाडक्या लक्ष्या मामांचा सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. यामध्ये लक्ष्मीकांत यांच्याबरोबर पत्नी प्रिया बेर्डे सुद्धा पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘या’ तीन निकषांवर ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेची निर्माती श्रुती मराठे स्वीकारते काम; म्हणाली…

लक्ष्मीकांत बेर्डे ऑफिशियल या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘जोडी नंबर वन’ या कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे यांच्याबरोबर अभिनेत्री रेशम टिपणीस, अतुल परचुरे आणि सोनिया परचुरे पाहायला मिळत आहेत. ‘जोडी नंबर वन’ हा एकेकाळचा लोकप्रिय कार्यक्रम होता. यामध्ये फक्त सिनेसृष्टीतील जोडी नाही तर सर्वसामान्य जोडप्यांना बोलावून त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या जायच्या. याच कार्यक्रमात एकेदिवशी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अतुल परचुरे त्यांच्या पत्नींबरोबर हजर राहिले होते. त्यावेळी दोन्ही जोडप्यांना आपापल्या जोडीदाराविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. यादरम्यानचा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे.

हेही वाचा – Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील दोन अवनींची हार्दिकबरोबरची मज्जा-मस्ती, पडद्यामागचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये कार्यक्रमाची होस्ट रेशम टिपणीस लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांना एकमेकांच्या आवडी-निवडी विषयी विचारताना दिसत आहे. पहिल्यांदा ती लक्ष्मीकांत यांना विचारते की, ‘तुमच्या आवडता गुण कोणता, जो प्रिया बेर्डे यांना आवडतो?’ यावर लक्ष्मीकांत म्हणतात की, “माझ्यातला आवडता गुण…?” तितक्यात रेशम म्हणते की, ‘एवढा वेळ तुम्ही घेऊ शकत नाही. सतत हसवतं राहणे टेन्शनमध्ये सुद्धा, हा प्रिया बेर्डेंना तुमच्यातला गुण आवडतो.’

पुढे रेशम लक्ष्मीकांत यांना विचारते की, ‘प्रिया यांना दिलेली पहिली भेट?’ “बऱ्याच दिल्या आहेत, पण पहिली…”असा विचार करताना लक्ष्मीकांत बेर्डे दिसतात. पण पुन्हा रेशम म्हणते की, ‘पहिलीच भेट..बऱ्याच नाही..’ तितक्यात लक्ष्या मामा म्हणतात की, “साडी.” मग त्यांना पत्नी प्रिया यांना आवडलेली भूमिका विचारली जाते. तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे लगेच उत्तर देत म्हणतात की, “एक होता विदुषक.”

हेही वाचा – Video: राष्ट्रगीताला चुकीच्या पद्धतीनं उभी राहिल्यामुळे करीना कपूर ट्रोल; नेटकरी म्हणाले, “लज्जास्पद…”

यानंतर प्रिया बेर्डे यांना लक्ष्मीकांत यांच्या आवडी-निवडींविषयी विचारलं जात. पहिल्यांदा प्रिया यांना लक्ष्मीकांत यांच्या आवडत्या पुस्तकाबद्दल विचारलं जात. तेव्हा त्या म्हणतात की, “व्यक्ती आणि वल्ली.” हे उत्तर ऐकून लक्ष्या मामा आश्चर्य चकीत होऊन म्हणतात की, “आई शप्पथ…” मग प्रिया यांना लक्ष्मीकांत यांच्या आवडत्या नाटकाविषयी विचारलं जातं. तेव्हा त्या अचूक उत्तर देत म्हणतात की, “सर आली धावून.” त्यानंतर रेशम प्रिया यांना लक्ष्मीकांत यांच्या आवडत्या दिग्दर्शकाविषयी विचारते. तेव्हा प्रिया म्हणतात की, “मराठी की हिंदी?” तर रेशम म्हणते. “मराठी.” मग प्रिया लक्ष्मीकांत यांचे आवडते दिग्दर्शक महेश कोठारे असल्याचं सांगताना दिसत आहेत. असा हा लक्ष्मीकांत यांचा जुना व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – “माझी कंबर…” साडी नेसण्याच्या पद्धतीवरून ट्रोल करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “स्त्रीने काहीही परिधान केलं तरी…”

हा जुना व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना अजूनही लक्ष्मीकांत बेर्डे असल्यासारखं वाटत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. एका नेटकरीनं लिहीलं आहे की, ‘थोड्या वेळासाठी वाटलं की, लक्ष्मीकांत बेर्डे आजपण बरोबर आहेत.’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं की, ‘असं वाटतं अजूनही माझा आवडता अभिनेता आमच्याबरोबर आहे.’ तसेच तिसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, ‘आता असते तर किती भारी झालं असतं. देव चांगल्या माणसांना का लवकर घेऊन जातो?’ शिवाय चौथ्या नेटकऱ्यानं फक्त ‘लक्ष्या मामा’ लिहीत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxmikant berde and priya berde old video goes viral on social media pps