बॉलीवूडमध्ये ९०चं दशक गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये माधुरी दीक्षितचं नाव आघाडीवर आहे. हिंदी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बकेट लिस्ट’ चित्रपटातून तिने मराठी मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. मोठ्या पडद्यावर चाहत्यांचं भरभरून मनोरंजन करणारी ही अभिनेत्री आता निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘१५ ऑगस्ट’ चित्रपटानंतर आता माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट येत्या ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पंचक’ चित्रपटाचं शूटिंग कोकणात सावंतवाडी येथे झालेलं आहे. यानिमित्ताने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने बालपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अभिनेत्री म्हणाली, “माझी आजी-पणजी सगळे कोकणामध्ये होते. त्यामुळे आम्ही लहानपणी त्यांना भेटायला कोकणात जायचो. माझ्याबरोबर माझी चुलत भावंडं सुद्धा गावी यायची. झाडावर चढायचं, आंबे खायचे…या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या आहेत.”

हेही वाचा : Video : लग्नानंतर मुग्धा वैशंपायनचं सासरी ‘असं’ झालं स्वागत! उखाणा घेत प्रथमेश म्हणतो, “माझी गरीब गाय…”

“आम्हा सगळ्या भावंडांचं वय तेव्हा ८ ते ९ वर्ष होतं. त्यावेळी आमच्या गावी एक मोठा झोका होता. त्यावर आम्ही खेळत बसायचो. आमचे आजोबा खूप कडक शिस्तीचे होते. त्यामुळे त्यांचा आवाज ऐकला की आम्ही सगळे पळून जायचो. त्यांना बघून पळून जाण्याचं कारण म्हणजे, आजोबा आल्यावर आम्हाला सगळ्यांना कामाला लावायचे. हे काय झोके घेत बसलात…चला शेण सारवायला लागा असं सांगायचे. माझे आजोबा सगळ्यांकडून अंगणात शेण सारवून घ्यायचे. आमच्या रत्नागिरीच्या घरी शेणाने सारवलेलं अंगण होतं. त्यामुळे पाणी शिंपडून व्यवस्थित सगळं करावं लागायचं. आजोबांना आम्ही सगळीच भावंडं खूप घाबरायचो…त्यामुळे ही सगळी कामं करायचो.” असं माधुरी दीक्षित यांनी सांगितलं.

हेही वाचा : “माझे पात्र…”, राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण न मिळाल्याने ‘रामायण’मधील लक्ष्मण नाराज, म्हणाले…

कोकणातील आठवणी सांगताना डॉ. श्रीराम नेने म्हणाले, “आम्ही दरवर्षी दिवेआगारला जायचो. बैलगाडी, कोकणातील विविध पदार्थ, भात, आंबे ही सगळी धमाल आम्ही केली आहे. तेव्हा मी ७-८ वर्षांचा होतो. आम्ही एसटी बसने गावी जायचो…अशा खूप आठवणी आहेत.” दरम्यान, माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांची निमिर्ती असलेल्या ‘पंचक’मध्ये आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, तेजश्री प्रधान, आनंद इंगळे, सतीश आळेकर, भारती आचरेकर, आरती वडगबाळकर, नंदिता पाटकर, गणेश मयेकर, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आशिष कुलकर्णी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit recalls her childhood memories in kokan region sva 00