मराठी आणि हिंदी मालिका, चित्रपटांमधून खलनायक साकारणारे अभिनेते म्हणून मिलिंद गुणाजी यांना ओळखले जाते. मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी याने मनोरंजन विश्वात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने अभिनेत्री पूजा सावंत हिने एक पोस्ट शेअर केली आहे.
मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मनसे नेते अमित ठाकरेही दिसत आहेत. अमित ठाकरे यांनी या चित्रपटाच्या मुहूर्ताचा पहिला क्लॅप दिला.
आणखी वाचा : “खरी शिवसेना कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची?”; अभिजीत बिचुकले म्हणाला “शिवरायांचं नाव असेल तर…”
पूजा सावंतची पोस्ट
“श्री गजानन प्रॉडक्शन निर्मित ‘रावण कॉलिंग’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अमित राज ठाकरे यांनी मुहूर्ताचा पहिला क्लॅप दिला. संदीप दंडवते, संदीप बंकेश्वर आणि अभिषेक गुणाजी यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक गुणाजी आणि संदीप बंकेश्वर यांनी केले आहे. तर या चित्रपटाची सहायक पटकथा आणि संवाद सचिन दरेकर यांचे आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने नामवंत अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘रावण कॅालिंग’मध्ये सचित पाटील, पूजा सावंत, वंदना गुप्ते, गौरव घाटणेकर, रवी काळे, बिपीन नाडकर्णी राजू शिसाटकर आणि सोनाली कुलकर्णी, मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या तरी हा चित्रपट कशावर आधारित आहे, याबाबत गोपनीयता असली तरी लवकरच या गोष्टी उलगडतील”, असे पूजा सावंतने म्हटले आहे.
आणखी वाचा : Video : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आजही राहते चाळीत, गिरगावातील घराजवळ तीन थर लावत फोडली दहीहंडी
दरम्यान श्री गजानन प्रॉडक्शन निर्मित’रावण कॉलिंग’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी करत आहे. यानिमित्ताने त्याने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटात सचित पाटील, पूजा सावंत, वंदना गुप्ते, गौरव घाटणेकर, रवी काळे, बिपीन नाडकर्णी राजू शिसाटकर आणि सोनाली कुलकर्णी, मिलिंद गुणाजी हे कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट कशावर आधारित आहे, याबाबतची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.