रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखचा ‘वेड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहे. तिसऱ्या आठवड्यातही ‘वेड’ची यशस्वी घौडदोड सुरूच आहे. या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांना वेड लावलं आहे. ‘सुख कळले’ व ‘वेड लावलंय’ या गाण्यांवर चाहते रील बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेशच्या ‘वेड लावलंय’ गाण्याची भूरळ सगळ्यांनाच पडली आहे. अनेक व्हिडीओही रितेश त्याच्या इस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत आहे. ‘वेड लावलंय’ गाण्यावर मनसे नेता अमेय खोपकर यांच्या मुलानेही व्हिडीओ बनवला आहे. इशान खोपकरचा हा व्हिडीओ रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. परंतु, या व्हिडीओत एक ट्वीस्ट आहे.

हेही वाचा>> ‘घर मोहे परदेसिया’ गाण्यावर थिरकली मुकेश अंबानींची धाकटी सून; मेहेंदी सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल

इशान खोपकरने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रितेशने त्याला स्वत: मेसेज करुन रील बनवायला सांगितल्याचं दिसत आहे. “इशान वेड लावलंय गाण्यावर रील कधी बनवणार”,असा रितेशने मेसेज केल्यावर “लगेच बनवतो” असा रिप्लाय इशानने दिल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यांनतर वेड लावलंय ची हूक स्टेप करत इशानने गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. इशानचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हेही वाचा>>राखी सावंतच्या मदतीला मुकेश अंबानी आले धावून, अभिनेत्री आभार मानत म्हणाली…

हेही वाचा>> “…म्हणून मी चांगली आई झाले”, जिनिलीया देशमुखने मुलांबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत

रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटाची ५० कोटींकडे वाटचाल सुरू आहे. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं आहेत. तर जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून वेडच्या निमित्ताने तिने मोठ्या पडद्यावर तब्बल १० वर्षांनी कमबॅक केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader amey khopkar son video on riteish deshmukh genelia deshmukh ved lavlay song kak