महाराष्ट्राला ‘वेड’ लावणारा रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखचा मराठी चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच ‘वेड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवायला सुरुवात केली. तिसऱ्या आठवड्यातही ‘वेड’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदोड सुरुच आहे.

‘वेड’ चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं. तर जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने पडद्यावर तब्बल दहा वर्षांनी कमबॅक केलं आहे. रितेशबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर जिनिलीयाने करिअरमधून ब्रेक घेतला होता. दोन मुलं झाल्यानंतर जिनिलीयाने पुन्हा ‘वेड’ चित्रपटाच्या निमित्ताने तिच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.

Loksatta editorial Salman Khan house attacked by two assailants on a bike
अग्रलेख: सलमानी सुल्तानी!
Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”

हेही वाचा>>महाराष्ट्राला ‘वेड’ लावल्यानंतर जिनिलीया देशमुख नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला; सिंगल मदरची भूमिका साकारणार

‘वेड’च्या निमित्ताने जिनिलीयाने अनेक मुलाखती दिल्या. नुकत्याच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत जिनिलीयाने तिचं मातृत्व व मुलं याबाबत भाष्य केलं. जिनिलीया म्हणाली, “रितेश जेव्हा पहिल्यांदा श्रावणी ही भूमिका घेऊन माझ्याकडे आला. तेव्हा हे सगळं मला जमेल का? असं मी त्याला विचारलं होतं. तुला या भूमिकेसाठी दुसरी अभिनेत्रीला संधी द्यायची आहे का? कारण मुलांमधून हे सगळं करू शकेन, याबाबत मला खात्री नाही, असं मी त्याला म्हणाले होते. पण तुला मॅनेज करावं लागेल, असं रितेश मला म्हणाला. आज मला वाटतं की मी एक आत्मविश्वासू आणि चांगली आई आहे”.

हेही वाचा>>“आय एम गौरव मोरे…” दुबईतही फिल्टरपाड्याच्या बच्चनची हवा; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला…

“याआधी मी दहा वर्ष २४ तास माझ्या मुलांबरोबर असायचे. ‘वेड’ चित्रपटाच्या शूटिंगमुळे मला  बाहेर जावं लागायचं. तेव्हा मी त्यांच्याबरोबर नसायचे. पण आमच्या मुलांनी माझ्या वेळेचा आदर केला. एक पालक म्हणून मुलांनी इतरांच्याही कामाचा, व्यवसायाचा आदर केला पाहिजे, असं मला वाटतं. जर मी आधीसारखीच २४ तास त्यांच्याबरोबर राहिले असते, तर कदाचित त्यांना दुसऱ्या किंवा कामावर जाणाऱ्या महिलांबाबत जाणून घेण्यात अडचणी आल्या असत्या. मी करिअरकडे वळण्याचा निर्णय घेतला. पण अजूनही मला आईपणात जास्त आनंद मिळतो”,असंही जिनिलीया म्हणाली.

हेही वाचा>>चित्रा वाघ यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर उर्फीचं ट्वीट, म्हणाली “आत्महत्या करण्यासाठी…”

रितेश व जिनिलीया यांना दोन मुलं आहेत. त्यांनी त्यांच्या मुलांवर उत्तम संस्कार केले आहेत. अनेकदा मुलांबरोबरचे फोटो व व्हिडीओही ते शेअर करताना दिसतात.