प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे सध्या त्यांच्या आगामी ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात आकाश ठोसर, सयाजी शिंदे आणि सायली पाटील मुख्य भूमिकेत झळकत आहे. त्याबरोबरच या चित्रपटात नागराज मंजुळेही पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. यानंतर नागराज मंजुळेंनी पुढचा चित्रपट कोणता करणार याबद्दल सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ‘लोकसत्ताच्या डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. यावेळी आकाश ठोसर, सायली पाटील, नागराज मंजुळे आणि मंगेश कुलकर्णी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल आणि त्यातील भूमिकेबद्दल सांगितले.
आणखी वाचा : आकाश ठोसर लग्नासाठी तयार, एकमेव अट सांगत म्हणाला “त्या मुलीला फक्त…”

“मी लवकरच अजून एका चित्रपटात झळकणार आहे. ‘फ्रेम’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात मी आणि अभिनेता अमेय वाघ झळकणार आहोत. ‘झुंड’ चित्रपटानंतर एक अभिनेता म्हणून मला अनेक चित्रपटांसाठी विचारण्यात आले. त्यावेळी अनुराग आणि मी ‘फ्रँडी’ एकत्र पाहिला होता. तेव्हापासून अनुरागने मला म्हणत होता की, तुला घेऊन मला एक चित्रपट करायचा आहे.

मी अनेक चित्रपटात छोटे-मोठी पात्र साकारली आहेत. अभिनेता म्हणून माझं करिअर गुपचूप सुरु आहे. पण दिग्दर्शक निर्माता हे जरा जास्त चांगलं वाटतंय”, असे नागराज मंजुळे म्हणाले.

आणखी वाचा : “ही वेळ आपल्या घरच्या मुलीवरही येऊ शकते”, प्रसिद्ध इन्स्टा स्टारची व्हायरल अश्लील व्हिडीओप्रकरणी पोलिसांत धाव, म्हणाली “लोकांना मजा मारायला…”

दरम्यान ‘घर बंदुक बिरयानी’ चित्रपटात नागराज मंजुळेंनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली आहे. तर हेमंत अवताडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagraj manjule share screen with amey wagh disclose next movie name loksatta exclusive watch video nrp