लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर सध्या पूजाच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या तिचे गोव्यातील फोटो-व्हिडीओ चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेत आहेत. लग्नाआधी आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींबरोबर पूजा गोव्याला गेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूजा सावंत, भूषण प्रधान, प्रार्थना बेहेरे या तिघांची गेल्या अनेक वर्षांपासून घट्ट मैत्री आहे. त्यामुळे लाडक्या मैत्रिणीच्या Bride To Be पार्टीला प्रार्थना-भूषण गोव्याला गेले होते. यावेळी या पार्टीला प्रार्थनाचा नवरा अभिषेक जावकर देखील उपस्थित होता. या सगळ्यांनी गोव्याच्या समुद्रकिनारी पूजा सावंतची Bride To Be पार्टी केली.

हेही वाचा : “व्याजाचा हप्ता…”, ‘असा’ आहे कुशल बद्रिकेचा नव्या वर्षाचा संकल्प; पोस्ट वाचून नेटकरी म्हणाले, “दादा जमलं तर…”

पूजाने यावेळी लाला रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला होता. अभिनेत्रीला सर्वांनी नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या पूजाने शेअर केलेल्या Bride To Be पार्टीच्या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी भूषण-प्रार्थना व पूजामध्ये असलेल्या सुंदर मैत्रीचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss 17 : “पाय चाटू शकतेस”, आयेशा खानचं अपमानास्पद उत्तर ऐकून अंकिता लोखंडे संतापली; म्हणाली, “तू…”

दरम्यान, पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगायचं झालं, तर सिद्धेश चव्हाण हा ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कार्यरत आहे. लवकरच पूजा आणि सिद्धेश विवाहबंधनात अडकणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja sawant celebrated bride to be party in goa bhushan pradhan prarthana behere shares video sva 00