Pooja Sawant decorated a beautiful Makhar: सण-उत्सव यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. नुकताच गणेशोत्सव पार पडला. त्यावेळी सगळीकडे आनंद व उत्साह पाहायला मिळाला. सर्वसामान्यांसह कलाकारांनी मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा केला. आता लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे.
नवरात्री हा सणदेखील संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. दुर्गादेवीची पूजा केली जाते. आता अभिनेत्री पूजा सावंतने नवरात्रीची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती देवीसाठी मखर बनवत आहे. तिने फुलांचे सुंदर मखर बनवले आहे, त्याची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच तिच्या मांजराची झलकदेखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
आता पूजाने शेअर केलेल्या या व्हिडीओला, “तयारी…आईच्या आगमनाची”, अशी कॅप्शन दिली आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर लाइक्सचा पाऊस पडत आहे. अनेकांनी कमेंट्स करत तिचे कौतुकही केले आहे.
नेटकरी काय म्हणाले?
अनेक नेटकऱ्यांनी पूजाचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले, “मस्त”, दुसऱ्याने लिहिले, “गोड”, आणखी एकाने लिहिले, “तुम्ही खूप सुंदर दिसत आहात.”
तसेच, सुंदर, छान अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत पूजाचे कौतुक केले आहे. आता पूजा नवरात्रीसाठी आणखी काय तयार करणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अभिनेत्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. फिरायला गेल्याचे, तिच्या खासगी तसेच व्यावसायिक आयुष्याविषयी माहिती देणारे अनेक व्हिडीओ, फोटो, पोस्ट ती शेअर करत असते. तिच्या व्हिडीओंना मोठा प्रतिसाद मिळतो. तिचे दोन दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचे तर तिने दगडी चाळ, बोनस, जंगली, बाली, भेटली तू पुन्हा, विजेता, वृंदावन अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. तिच्या भूमिकांतून आणि अभिनयातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनेकदा ती तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.