मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत जिला कलरफुल म्हणूनदेखील ओळखलं जातं ती काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पूजा तीन महिन्यांपूर्वी सिद्धेशबरोबर लग्नबंधनात अडकली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूजा सोशल मीडियावर सक्रिय असते. पूजाचे लाखो चाहते आहेत. चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी लग्नानंतरही अभिनेत्रीनं तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या. आता तिच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. त्यासाठी तिनं पती सिद्धेशसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा… ‘हीरामंडी’ फेम ताहा शाह करतोय प्रतिभा रांताला डेट? अभिनेता म्हणाला, “मी प्रेमपत्र…”

पूजानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात पूजा तिच्या लग्नाचा शालूत दिसतेय. मिरर सेल्फी काढत तिनं हा फोटो शेअर केलाय. हा फोटो लग्नातलाच आहे, असं दिसतंय. मेंदीनं रंगलेले हात, हातात हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, खुले केस यांमुळे अभिनेत्रीचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय. ‘मिसेस झाल्यानंतरचा पहिलाच फोटो. लग्नाला तीन महिने झालेसुद्धा,’ अशी कॅप्शन पूजानं या फोटोला दिलीय. पूजानं शेअर केलेल्या या फोटोवर सिद्धेशनं “मला तुझी आठवण येतेय”, अशी कमेंट केलीय.

पूजानं इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा आणि सिद्धेशचा एक रोमॅंटिक फोटोदेखील शेअर केलाय. या फोटोमध्ये पूजानं मोरपिशी रंगाचा ड्रेस घातलेला दिसतोय; तर सिद्धेशनं निळ्या रंगाचं ब्लेझर आणि सफेद शर्ट परिधान केलाय. या फोटोमध्ये पूजा सिद्धेशला किस करताना दिसतेय. “असं वाटतंय की, आपण कालच भेटलोय”, असं कॅप्शन पूजानं या फोटोला दिलंय.

हेही वाचा… शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांनी खरेदी केलं तब्बल इतक्या कोटींचं अपार्टमेंट; किंमत वाचून व्हाल थक्क

पूजानं शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. “कलरफुल! खूप सुंदर दिसतेयस”, अशी कमेंट करीत एका चाहत्यानं लिहिलं. तर अनेकांनी तिला लग्नाला तीन महिने झाले. यानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा… मनोज बाजपेयींनी सांगितली माजी क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या भेटीची ‘ती’ आठवण, म्हणाले, “मला खूप महत्वाची…”

दरम्यान, पूजा आणि सिद्धेशच्या नात्याबद्दल सांगायचं झालं, तर पूजानं एक अनोखी पोस्ट शेअर करीत तिच्या आणि सिद्धेशच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी साखरपुडा करीत पूजानं चाहत्यांना सुखद धक्का दिला. पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा २८ फेब्रुवारी २०२४ रोजी थाटामाटात पार पडला. मेंदी, संगीत, हळद मग सत्तपदी, असे विधी पार पाडत दोघं लग्नबंधनात अडकले. दोघांच्या लग्नाला प्रार्थना बेहेरे, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, सुखदा व अभिजीत खांडकेकर अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja sawant shared romantic photo with husband siddhesh for completing 3 months of marriage dvr