Prajakta Mali on Renuka Shahane: अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतून तिला मोठी लोकप्रियता मिळाली. प्राजक्ताने फक्त मालिकेतच काम केले नाही, तर तिने चित्रपटांतही उत्तम भूमिका साकारल्या.
खो-खो, हंपी, पांडू, डोक्याला शॉट, वाय, चंद्रमुखी, चिकी चिकी बुबुम बूम, पावनखिंड व फुलवंती अशा चित्रपटांत तिने विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या. त्याबरोबरच टेलिव्हिजनवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे ती सूत्रसंचालनही करते.
प्राजक्ता माळीने शेअर केलेला फोटो पाहिलात का?
आता प्राजक्ता माळी तिच्या अभिनयामुळेच नाही, तर तिच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळेही चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्याबरोबर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रेणुका शहाणे आणि प्राजक्ता माळी यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू दिसत आहे. दोघीही अत्यंत सुंदर दिसत आहेत.
हा फोटो शेअर करीत प्राजक्ता माळीने लिहिले, “आतून आणि बाहेरून सुंदर असलेली स्त्री”, पुढे तिने रेणुका शहाणे यांना टॅग करत लिहिले, “आपण सतत भेटत राहिले पाहिजे”, असे लिहीत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. प्राजक्ताची ही इन्स्टाग्राम स्टोरी रेणुका शहाणे यांनी रिपोस्ट करीत इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले.
प्राजक्ता अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. अनेकदा ती तिचे फोटो शेअर करते. त्याबरोबरच तिच्या व्यावसायिक, तसेच खासगी आयुष्यातील अनेक अनुभवदेखील शेअर करते. तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्टनाही चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. सोशल मीडियावर तिचे २.३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
अभिनेत्रीने निर्मिती क्षेत्रातही काम करण्यास सुरुवात केली आहे. २०२४ ला प्रदर्शित झालेल्या फुलवंती या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी प्राजक्ताने घेतली होती. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती. तिच्याबरोबर गश्मीर महाजनीदेखील प्रमुख भूमिकेत होता. चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रेणुका शहाणे यांच्या कामाबद्दल बोलायचे, तर त्या ‘देवमाणूस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. या चित्रपटात महेश मांजरेकरदेखील प्रमुख भूमिकेत होते.