Rinku Rajguru Talk About Better Half : ‘सैराट’सारखा हिट चित्रपट दिल्यानंतर रिंकू राजगुरु हे नाव अवघ्या महाराष्ट्रात पोहोचलं आहे. एका गावातील सामान्य मुलगी अन् तिच्या आयुष्यातील घडामोडी रिंकूने अचूक साकारल्या. ‘सैराट’मधील आर्ची या पात्राने रिंकूला महाराष्ट्रातील घराघरांत ओळख मिळवून दिली. ‘सैराट’नंतर रिंकू काही इतर सिनेमा आणि सीरिजमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली; पण चाहत्यांच्या मनात आजही ‘सैराट’ची आर्चीच आहे.
‘सैराट’मुळे रिंकूच्या महाराष्ट्रभरात चांगलाच चाहता वर्ग निर्माण झाला आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी रिंकू सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच लवकरच तिचा ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचनिमित्त ती ठिकठिकाणी मुलाखती देत आहे.
अशातच एका मुलाखतीत रिंकूने तिच्या बेटर हाल्फबद्दल सांगितलं आहे. महाराष्ट्र टाइम्स मनोरंजनशी संवाद साधताना रिंकूला बेटर हाल्फ म्हणून कशी व्यक्ती हवी आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत रिंकू म्हणते, “असं एका व्याख्येत सांगू शकत नाही. हेच असायला पाहिजे किंवा तेच असायला पाहिजे… असं सांगता येणार नाही. कोणी भेटलं तर त्याच्यातल्या न आवडणाऱ्या गोष्टीही आवडू लागतात. कारण तो माणूस आपल्याला आवडलेला असतो. मी खूप साधी मुलगी आहे. मला खूप साधी आणि चांगली माणसं आवडतात. मी कधी त्याचा असा विचार केला नाही.”
रिंकू राजगुरु इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे प्रार्थना सांगते, “मी तिला (रिंकू) सांगितलं आहे की, तू तुझा वेळ घे आणि वाटेल तेव्हाच लग्न कर. उगाच प्रेशरमध्ये येऊन लग्न करू नको. छान करिअर सुरू आहे आणि करिअर टॉपवर आहे; तर आता कसं लग्न करू? असा विचारही करू नको. जर एखादा आवडलाच, तर करून टाक. पण तो व्यक्ती आवडला तरच… तो व्यक्ती जर योग्य असेल; तरच कर. घाई करू नको. असं मी नेहमी सांगते. कारण मीसुद्धा माझ्या करिअरमध्ये तसंच केलं. करिअर नीट सुरू असताना मला वाटलं तेव्हा मी लग्न केलं. त्यामुळे रिंकूलासुद्धा मी हाच सल्ला दिला.”
दरम्यान, ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या सिनेमात रिंकूसह प्रार्थना बेहेरे, अनिकेत विश्वासराव आणि सुबोध भावेही मुख्य भूमिकांत आहे. गूढ, विनोद आणि प्रेम यांचा उत्तम मेळ असलेला ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ हा सिनेमा येत्या २२ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.