सध्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ५ फेब्रुवारीला सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली. तेव्हापासून मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर तर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नुकताच सचिन पिळगांवकर यांनी ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. अजूनही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. चित्रपटातील गाणी असो, डायलॉग असो किंवा भूमिका आजही त्यावर मराठी रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. अशातच आता ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट येणार असल्यामुळे प्रेक्षकांचा एक वेगळाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – “सरोगसी सारखा…”, ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपट पाहून प्रथमेश परबच्या होणाऱ्या बायकोची प्रतिक्रिया, म्हणाली, “तुझा…”

चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. “शूटिंग सुरू, मज्जा सुरू, ‘नवरा माझा नवसाचा २’…गणपती बाप्पा मोरया”, असं कॅप्शन देत सचिन यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – लग्नाआधीच्या व्हॅलेंटाईन डेला तितीक्षा तावडेचा प्लॅन काय? म्हणाली, “सिद्धार्थबरोबर…”

सचिन पिळगांवकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. उत्कर्ष शिंदे, रवी जाधव, अजिंक्य राऊत, आनंदी जोशी अशा अनेक कलाकारांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin pilgaonkar shared a video on the sets of navra maza navsacha 2 pps