चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला. मात्र, या सामन्यादरम्यान शुबमन गिल बाद झाल्यावर पाकिस्तानचा खेळाडू अबरार अहमदने दिलेली प्रतिक्रिया सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे. पाकिस्तानच्या अबरार अहमदने टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिलला क्लीन बोल्ड करून भुवई उंचावत डोळे दाखवले होते. भुवई उंचावून त्याने गिलला पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा इशारा केला होता. अबरारची ही प्रतिक्रिया भारतीय क्रिकेटप्रेमींना अजिबातच रुचली नव्हती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियाने सामना जिंकल्यावर भारतीय क्रिकेटप्रेमींनी अबरारला चांगलंच ट्रोल केलं. सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले होते. यावर आता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय संगीतकार व गायक सलील कुलकर्णी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत अबरारला खडेबोल सुनावले आहेत. ‘दबंग २’ सिनेमातील एका सीनचं वर्णन करत सलील कुलकर्णी यांनी अबरारसाठी पोस्ट लिहिली आहे. त्यांची सविस्तर पोस्ट काय आहे पाहूयात…

सलील कुलकर्णी यांची पोस्ट

तर बालमित्रांनो ,
हा माणूस पाहा…
उगीचच माज करताना दिसतो आहे.

तुम्ही ‘दबंग २’ पाहिला असेलच. त्यात गुंड विधायक बच्चा याचा भाऊ गेंदा लग्नात मुलीला पळवायला जातो आणि मग चुलबूल पांडे येतो. तेव्हा हा छोटा गुंडूकला खूप बडबड करतो. तेव्हा त्याचा Assistant गुंड “लगता है गेंदा भैय्या भावनोमे बह गये है” असं म्हणतो आणि मग चुलबूल पांडे त्या गेंदाची मान मोडतो. यांचं असंच झालंय.

तात्पर्य – आपली कारकीर्द केवढुशी… त्यात एक दिवसीय सामन्यात, तुमच्या देशातल्या कोणत्याही बॅट्समनपेक्षा सरासरी जास्त ( Odi Average 62.1 ) असलेल्या शुभमन गिलला… ज्याच्याविषयी अफवा सुद्धा मोठ्या माणसाच्या मुलीबाबत उठतात… अशा माणसाला कधीही उगाच बोलू नये!!

जुने जाणते सांगतात त्याप्रमाणे.. आपली उंची, पगार… ताकद बघून शहाणपणा करावा!!

त्याने टाकलेला चेंडू चांगला होता पण, ‘बॉल ऑफ द टूर्नामेंट’ वगैरे म्हणजे पुन्हा एकदा कॉमेंट्रीमध्ये गेंदा भैय्या भावनेत वाहून जाण्याचा प्रकार… असे बॉल… रवी अश्विन प्रत्येक मॅचमध्ये टाकायचा आणि वरुण चक्रवर्ती वारंवार टाकतो. तेव्हा उगाचच जास्त शहाणपणा नसावा.

तर बालमित्रांनो, छोटी कामगिरी केलीत आणि नीट वागलात तर कौतुक होईल, शहाणपणा केला तर चुलबूल पांडे मान मोडेल.

ता.क. – रशीद खान, नूर अहमद, नबी वगैरे अफगाण स्पिनर्स याहून खूप भारी आहेत पण ते असला माज करत नाहीत.
ता.क. २ – बच्चा भैय्या, गेंदा, चुलबूल वगैरे नावं स्क्रिप्टमध्ये सुचणाऱ्यांना.. वरचा “सा” द्यायलाच हवा.

दरम्यान, सलील कुलकर्णी यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “क्या बात है सलील दा”, “पुणेरी पाहुणचार”, “अफवा पण मोठ्या माणसांच्या मुलींबाबतीत उठतात Was Lit”, “अगदी साजेसं उदाहरण दिलं आहे वाह सर, मराठी कॉमेन्ट्री सुरू करा” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saleel kulkarni slams pakistani player abrar ahmed shares post for shubman gill sva 00