Premium

समीर वानखेडेंना पुन्हा धमकी, क्रांती रेडकर संताप व्यक्त करत म्हणाली, “आम्हाला दाऊदच्या नावाने…”

“उद्या आमच्यावर किंवा आमच्या कुटुंबावर कोणताही हल्ला झाला, तर त्याला जबाबदार कोण?” क्रांती रेडकरचा सवाल

kranti redkar sameer wankhede

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना फेक ट्विटर अकाउंटवरून धमकी आली आहे. त्यांच्यासह त्यांच्या मुलींचाही या धमकीत उल्लेख आहे. सातत्याने धमक्या येत असल्याने पोलिसांत तक्रार करणार असल्याची माहिती समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्राती रेडकर म्हणाली, “धमक्या देणं, ट्रोल करणं हे खूप आधीपासून होत होतं. पण आम्ही दुर्लक्ष करायचो किंवा आम्ही विचार करायचो की त्यांना ब्लॉक करुयात. पण दोन दिवसांपासून वेगळंच सुरू झालंय. आता ज्या दोन ट्विटर हँडलवरून धमक्या येतायत, ते वेगळे वाटत आहेत. ते भारतीय ट्विटर हँडल नाहीत, आंतरराष्ट्रीय आहेत. त्या लोकांना भारत देश पसंत नाहीये. ते दाऊदचं नाव घेऊन आम्हाला धमक्या देत आहेत, आमच्या मुलांची नावं घेत आहेत. त्याचबरोबर ते भारतालाही शिवीगाळ करत आहेत. आपल्या केंद्र सरकारला, समीर वानखेडेंना शिवीगाळ करत आहेत. त्यांनी माझ्या दोन मुलींनाही त्यांनी धमकी दिली आहे.”

“मी मायलेकीला सोडलं नाही”; गौतमी पाटीलच्या वडिलांचा दावा; म्हणाले, “मी पुण्यात असताना…”

“उद्या आमच्यावर किंवा आमच्या कुटुंबावर कोणताही हल्ला झाला, कोणी अॅसिड फेकलं किंवा किडनॅप केलं, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न पडतोय. त्यामुळे जे घडतंय, त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात तक्रार देणार आहोत, त्यासाठी प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे,” असं क्रांती रेडकर ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना म्हणाली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2023 at 11:33 IST
Next Story
एकमेकांच्या प्रेमात होते रिंकू राजगुरु व आकाश ठोसर? अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्याने दिलं होतं उत्तर, म्हणाला, “आजही…”