अभिनेत्री शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे यांचा शाही विवाहसोहळा १ फेब्रुवारीला पार पडला. ३१ जानेवारीला साखरपुड्याचे फोटो शेअर करून दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर या दोघांनी १ फेब्रुवारीला ठाण्यात जवळचे नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यामुळे शिवानी-अजिंक्यच्या हळदी समारंभाचे फोटो व व्हिडीओ चाहत्यांनी आतापर्यंत पाहिले नव्हते. अखेर अभिनेत्रीने लग्नाच्या १८ दिवसांनंतर हळदी समारंभातील खास व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवानी-अजिंक्यने हळदी, संगीत व मेहंदी समारंभाचा एकत्रित सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्रीने हळदी समारंभाला खास पिवळी साडी नेसली होती. तसेच यावर तिने सुंदर असे फुलांनी घडवलेले दागिने परिधान केले होते. अभिनेत्रीला तिची लाडकी मैत्रीण मेघा धाडेने हळद लावली. यानंतर जवळच्या मित्रमंडळीसह या जोडप्याने संगीत समारंभाला धमाल डान्स केला होता. अजिंक्यने यावेळी पिवळ्या रंगाचा सदरा परिधान केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : “मी बहिरा नाहीये…”, रणबीर कपूर फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात करण जोहरवर भडकला, नेमकं काय घडलं?

शिवानी-अजिंक्यने लग्नाला १८ दिवस पूर्ण झाल्यावर हा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या जोडप्याच्या हळद व मेहंदी समारंभातील फोटो पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. अखेर आता या व्हिडीओवर शिवानीचे चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : “विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती”, नेटकऱ्याच्या ‘त्या’ पोस्टवर रितेश देशमुखचं थेट उत्तर; म्हणाला, “साफ खोटं…”

दरम्यान, शिवानी सुर्वेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर सध्या अभिनेत्री चित्रपटांमध्ये काम करत आहे. ती शेवटची ‘झिम्मा २’ चित्रपटामध्ये झळकली होती. याशिवाय अजिंक्य ननावरे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर आता या जोडप्याने लग्नबंधनात अडकत एका नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivani surve and ajinkya nanaware shares haldi and sangeet ceremony video of marriage sva 00