यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये पार पडला. या सोहळ्याचं प्रक्षेपण नुकतंच टेलिव्हिजनवर करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा यंदा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर व अभिनेता आयुष्मान खुराना यांनी सांभाळली होती. पुरस्कार सोहळ्याला सगळेच सेलिब्रिटी एकत्र उपस्थित राहत असल्याने त्यांच्यात कार्यक्रमादरम्यान अनेकदा चेष्टा, थट्टा-मस्करी होते. त्यामुळे पुरस्कार सोहळे पार पडल्यावर यातील अनेक लहान-लहान व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या रणबीर कपूरचा असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

फिल्मफेअर सोहळ्यातील या व्हायरल व्हिडीओमध्ये आयुष्मान, करण आणि रणबीर एकत्र संवाद साधत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये करण जोहर, “फक्त रणबीर हे करू शकतो, रणबीर हे करेल, रणबीरने हे केलंच पाहिजे, रणबीरने आम्हाला मदत केली पाहिजे” असं बोलून अभिनेत्याला भंडावून सोडतो. अखेर करणचं सगळं ऐकून घेतल्यावर रणबीर चिडून ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील त्याचा गाजलेला डायलॉग बोलतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
zee natya gaurav puraskar 2024
मोहन जोशींना यंदाचा ‘झी जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान! म्हणाले, “आताच्या नव्या पिढीने…”
vijay devarakonda sold filmfare
“दगडाचा तुकडा घरात…”, विजय देवरकोंडाने पहिल्या फिल्मफेअर पुरस्काराचा २५ लाख रुपयांत केलेला लिलाव
loksatta tarun tejankit award
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

हेही वाचा : “विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती”, नेटकऱ्याच्या ‘त्या’ पोस्टवर रितेश देशमुखचं थेट उत्तर; म्हणाला, “साफ खोटं…”

रणबीर चिडून करणला म्हणतो, “सुनाई दे रहा है, बहरा नहीं हूँ मैं” ( सगळं ऐकू येतंय मला…मी बहिरा नाहीये.) रणबीरचा हा डायलॉग ऐकून करण व आयुष्मानला धक्का बसल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. पुरस्कार सोहळ्यातील या व्हिडीओमध्ये भलेही रणबीर, करण आणि आयुष्यमानवर भडकल्याचं पाहायला मिळत असेल पण, प्रत्यक्षात हा संपूर्ण प्रकार शोच्या स्क्रिप्टचा भाग असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : चैतन्यचा राजीनामा अन् अर्जुनचा संताप! सायलीचा ‘तो’ निर्णय ऐकून पूर्णा आजीचा राग अनावर, पाहा प्रोमो

दरम्यान, यंदाच्या फिल्मफेअर सोहळ्यात रणबीरला त्याच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. रणबीरने हा पुरस्कार त्याचे वडील व दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांना समर्पित केला. डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत.