शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांची पहिली भेट २०१७ मध्ये ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. तेव्हापासून दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक वर्ष डेट केल्यावर शिवानी-अजिंक्य लग्न केव्हा करणार याबाबत त्यांच्या चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अखेर अभिनेत्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोमुळे शिवानी-अजिंक्यच्या चाहत्यांना दोघांच्या लग्नाबद्दल हिंट मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे यांनी पाँडेचेरीमध्ये नवीन वर्ष स्वागत केलं. त्यांचे पाँडेचेरीतील अनेक फोटो-व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या यातील एका रोमँटिक फोटोच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : ‘सूर नवा ध्यास नवा’ : अकोल्याचा गोपाळ गावंडे ठरला महाराष्ट्राचा ‘महागायक’, तर उपविजेते ठरले…

शिवानी सुर्वेने पाँडेचेरीतील समुद्रकिनाऱ्यावरून अजिंक्यबरोबरचा एक खास फोटो शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री लिहिते, “तुझी गर्लफ्रेंड म्हणून आता हे शेवटचं वर्ष” त्यामुळे ही लोकप्रिय जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये शिवानी साड्यांची खरेदी असल्याचं पाहायला मिळालं होतं.

शिवानीने काही दिवसांपूर्वीच सुरेखा तळवलकरांच्या ‘दिल के करींब’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने “लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल…सगळ्या गोष्टी ठरल्या आहेत” असं सांगितलं होतं. त्यामुळे आता शिवानी-अजिंक्य लग्नाची तारीख केव्हा जाहीर करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा : Video : आमिर खानच्या लेकीची लगीनघाई! मराठमोळ्या जावयाच्या घरातील Inside व्हिडीओ आला समोर, ‘या’ दिवशी होणार लग्न

शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरे

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर शिवानी सुर्वे नुकतीच झिम्मा २ चित्रपटात झळकली होती. याशिवाय अजिंक्य ननवारे सध्या ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी’ मुलगी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivani surve and ajinkya nanaware will get married in 2024 actress photo caption grabs attention sva 00