नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये वैभव मांगलेंनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांचं ‘अलबत्या गलबत्या’ हे बालनाट्य रंगभूमीवर विशेष लोकप्रिय ठरलं होतं. सध्या अभिनेते ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. कामाव्यतिरिक्त अभिनेते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांनी नुकताच शेअर केलेला एक रेसिपी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

वैभव मांगले या व्हिडीओमध्ये त्यांच्या मुलांसाठी पराठे बनवत असल्याचं पाहायला मिळत आहे. कलाकार शूटिंगच्या धावपळीतून वेळात वेळ काढून आपले कुटुंबीय तसेच मुलांबरोबर वेळ घालवत असल्याचं आपण पाहतो. सध्या वैभव मांगलेंचा स्वयंपाकघरातील असाच एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेते त्यांच्या मुलांसाठी पराठे बनवत आहेत. या व्हिडीओला अभिनेत्याने “पराठा तितुका मेळवावा” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : 12th Fail : शून्यातून सुरुवात, शिपायाचं काम अन् तिची साथ! IPS मनोज शर्मा आणि IRS श्रद्धा जोशींची प्रेरणादायी लव्हस्टोरी

अभिनेते म्हणतात, “आज मी माझ्या मुलांसाठी पराठे बनवत आहे. तुम्ही याला पनीर लच्छा पराठा देखील म्हणू शकता. या पराठ्याच्या पिठामध्ये मी साखर, दूध, मीठ, बेकिंग पावडर, ४ चमचे दही, कणिक अशी सगळी सामग्री वापरली आहे. या पराठ्यासाठी मी खास बारीक केलेल्या पनीरचं सारण बनवलं आहे. तसेच या सारणात पनीर, गाजर, सिमला मिर्ची, लाल-हिरवी मिर्ची, जिरं या सगळ्या गोष्टी आहेत.”

हेही वाचा : ‘एका माकडाने काढले दुकान’ गाण्यावर शाहरुख खानच्या लेकीचा डान्स, व्हिडीओ पाहून सलील कुलकर्णी म्हणाले, “आता तर मी निषेध…”

दरम्यान, अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “वाह दादा सुंदर”, “तुमची पाककला खूप सुंदर आहे”, “अरे वा! ही कलादेखील तुम्हाला अवगत आहे.”, “तुमच्या मुलांसमोर उत्तम उदाहरण ठेवताय” अशा विविध प्रतिक्रिया वैभव मांगले यांच्या चाहत्यांनी या रेसिपी व्हिडीओवर केल्या आहेत.