पूणे येथील ‘पॅनकार्ड क्लब’ मध्ये ‘जय भोले फिल्मस प्रोडक्शन’च्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘दगडाबाईची चाळ’ या मराठी चित्रपटाच्या पहिल्या सत्राचे चित्रीकरण जोरत सुरू आहे. राजपाल यादव, भूषण कडू, संग्राम साळवी, जॉनी रावत आणि आयटम गर्ल हिना पांचाळ यांनी चित्रीकरणात भाग घेतला. चित्रपटातील एक गाणे ‘मासोली ही घावायाची नाय तू जा रे पोरा’ हे गाणे ‘पॅनकार्ड क्लब’ च्या डिस्कोथेकमध्ये चित्रीत करण्यात आले. दिलीप मिस्त्री हे या गाण्याचे नृत्यदिग्दर्शक आहेत. तसेच चित्रपटातील काही महत्वाची दृष्ये येथील परिसरात चित्रीत करण्यात आली. दगडाबाई नावाच्या महिलेच्या चाळीत वेगवेगळया धर्माचे, प्रदेशाचे भाडेकरु रहात असतात. प्रत्येक सणामध्ये, सुखदुखांत चाळीतील सर्व लोक एकमेकांना साथ देत असतात. अचानक या चाळीत एक नाट्यमय प्रसंग घडतो. त्यामुळे चाळक-यांवर काय परिणाम होतात? या प्रसंगाचा ते एकत्र येऊन कसा मुकाबला करतात हे अत्यंत विनोद पद्धतिने या चित्रपटात मांडले आहे. ‘दगडाबाईची चाळ’ या चित्रपटाची निर्मिती ‘जय भोले फिल्म्स प्रोडक्शन’ या बॅनरखाली निर्माते दत्तात्रय हिंगणे यांनी केली असून, कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सुनील वाईकर यांचे आहे. चित्रपटातील संवाद अभिजीत पेंढारकर यांचे आहेत, तर नचिकेत जोग यांच्या गाण्यांना अद्वैत पटवर्धन यांनी स्वरसाज चढविला आहे. राजपाल यादव विशाखा सुभेदार, शिवानी सुर्वे, संग्राम साळवी, भूषण कडू, जॉनी रावत, सुनिल गोडबोले आणि मोहीनी कुळकर्णी यांच्या चित्रपटात भूमिका आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 19th Sep 2014 रोजी प्रकाशित
‘दगडाबाईची चाळ’ चित्रपटाच्या चित्रीकरणस सुरुवात!
पूणे येथील 'पॅनकार्ड क्लब' मध्ये 'जय भोले फिल्मस प्रोडक्शन'च्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘दगडाबाईची चाळ’ या मराठी चित्रपटाच्या पहिल्या सत्राचे चित्रीकरण जोरत सुरू आहे.

First published on: 19-09-2014 at 01:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie dagadabaichi chal