"मराठी सीरियलचा पॅटर्न आता आऊट ऑफ द बॉक्स होत चाललाय…" प्रसिद्ध अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत | marathi serial appi aamchi collector actor rohit parshuram instagram post viral nrp 97 | Loksatta

“मराठी सीरियलचा पॅटर्न आता आऊट ऑफ द बॉक्स होत चाललाय…” प्रसिद्ध अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मराठी मालिकांच्या बदललेल्या या स्वरुपावर नुकतंच एका कलाकाराने भाष्य केले आहे.

“मराठी सीरियलचा पॅटर्न आता आऊट ऑफ द बॉक्स होत चाललाय…” प्रसिद्ध अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मालिका हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येक घरात अगदी सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री मराठी मालिकांचा बोलबाला पाहायला मिळतो. या मालिकेच्या कथा प्रत्येक घरात काही प्रमाणात मिळत्या जुळत्या ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. सासू सुनेची तीच भांडण, कट कारस्थान या सर्व गोष्टींनी एक वेगळंच स्वरुप घेतलं आहे. यामुळे अनेक वाहिन्यांचा टीआरपीही घसरला होता. मात्र आता प्रत्येक मालिका, त्याचा आशय हा वेगळा असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी मालिकांच्या बदललेल्या या स्वरुपावर नुकतंच एका कलाकाराने भाष्य केले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

झी मराठीवर नुकतीच सुरू झालेली आप्पी आमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता रोहित परशुरामने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने मराठी मालिकांचा स्वरुप आऊट ऑफ द बॉक्स होत चाललंय असं म्हटलं आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “अलकाताई म्हणजे वाघीण, कोणाच्याही बापाला न घाबरणारी…” मिलिंद गवळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अभिनेता रोहित परशुरामची इन्स्टाग्राम पोस्ट

“मी २ वर्षांपूर्वी मुंबईच्या लोखंडवालामध्ये एका चॅनलमध्ये कामाला होतो. कंटेटच काम बघायचो, तेव्हा तिथे आलेले लेखक लोक फार छान छान स्टोरी मला सांगायचे. माझी स्टोरी ही एकदम OUT OF THE BOX आहे असं जवळपास प्रत्येकजण म्हणायचा. तेव्हापासून मला OUT OF THE BOX हा शब्दप्रयोग खूपच आवडायला लागला. त्याचा अर्थ काहीतरी वेगळं…. जगावेगळं हे कळलं तेव्हा मी तो बोलण्यात वापरायला लागलो. OUT OF THE BOX असं बोललं की मला कॉनव्हेंट शाळेत पहिला नंबर आल्यासारखं वाटायला लागलं..

दिवस निघून गेले….शब्दप्रयोग विस्मरणात गेला आणि मला ही सिरियल मिळाली…अप्पी आमची कलेक्टर..!! इथे आल्यावर, शूट सुरू झाल्यावर, आशुतोष सरांना भेटल्यावर मला वाटलं की OUT OF THE BOX शब्द बनवण्याआधी तो इंग्रजी लेखक की संशोधक आशुतोष सरांशी तास-दिडतास गप्पा मारून कॉलर ताठ करून गेला असेल आणि मग जगाला हा शब्दप्रयोग बहाल करून retire झाला असेल.

असो. अप्पी आमची कलेक्टर म्हणजे OUT OF THE BOX thinking चा एक उत्तम नमुना आहे हे मी एक अभिनेता म्हणून नाही तर एक प्रेक्षक म्हणून पण तेवढ्याच ठामपणे सांगू शकतो. ह्यात दाखवला जाणारा प्रत्येक सीन हा ज्या thought process ने शूट केला जातो ती प्रोसेस म्हणजे OUT OF THE BOX हे मला कळून चुकलंय.

असाच एक सीन आज येतोय तुमच्या समोर…. तुम्ही सगळे जण ज्या scene ची आतुरतेने वाट बघत होतात तो सीन_ हो….आज अप्पी आणि शहेनशाह समोरासमोर येतायेत. हा सीन पाहिल्यावर “मराठी सीरियलचा पॅटर्न आता OUT OF THE BOX होत चाललाय बरं का” अशी तुमची प्रतिक्रिया आली तर जिंकलो आम्ही !”, असे अभिनेता रोहित परशुराम याने म्हटले आहे.

आणखी वाचा : “मराठी टीव्ही सीरियलच्या इतिहासात…” ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान आप्पी आमची कलेक्टर ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरत आहे. आप्पी आणि शेहनशाहची जोडी हिट होईल, असा अंदाज नेटकरी लावत आहे. या मालिकेत सतत आप्पीला मदत करणारा शेहनशाहा नक्की कोण आहे हे येत्या भागात कळणार आहे. शेहनशाहचा खरा चेहरा आप्पीसमोर येणार आहे. मालिकेतील या भागात शूटींग फार खास पद्धतीनं करण्यात आलं आहे. आप्पी आणि शेहनशाहची भेट अनोख्या पद्धतीनं दाखवली जाणार आहे. याच निमित्तानं रोहित परशुरामने ही खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बॉयकॉट ट्रेंड असो वा आणखी काही, शाहरुखचा ‘जवान’ प्रदर्शनाआधीच ठरला सूपरहीट; कमावला एवढा नफा

संबंधित बातम्या

Akshaya Hardeek Wedding Live : “नांदा सौख्यभरे…” अक्षया देवधर-हार्दिक जोशीचा विवाहसोहळा संपन्न
हार्दिक-अक्षयाच्या पाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न, फोटो आले समोर
“मी खरा आहे कारण…” मानसी नाईकच्या नवऱ्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर थुंकतोय, तीन महिन्यांपूर्वी क्रांती…”, संजय राऊतांचं शिंदे सरकारवर टीकास्र!
पुण्यात गोवरचा रुग्ण नाही; दीडशे बालकांचे अहवाल नकारात्मक
प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालला जिन्यांवरून पडल्याने दुखापत; मुंबईच्या रुग्णालयात केलं दाखल
PAK vs ENG: “तबीयत ठीक नहीं है तो ५०० रन मारा, ठीक होते तो…” शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ओढले ताशेरे
Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांच्या पसंतीस पडली देसी जुगाड केलेली ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक; म्हणाले “जगासाठी…”