scorecardresearch

“अलकाताई म्हणजे वाघीण, कोणाच्याही बापाला न घाबरणारी…” मिलिंद गवळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अलकाताई म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील झाशीची राणी, असेही मिलिंद गवळींनी म्हटलं आहे.

“अलकाताई म्हणजे वाघीण, कोणाच्याही बापाला न घाबरणारी…” मिलिंद गवळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
मिलिंद गवळी अलका कुबल

‘माहेरची साडी’ या चित्रपटातून प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करुन त्यांच्या मनात एक खास जागा मिळविलेली अभिनेत्री म्हणून अलका कुबल- आठल्ये यांना ओळखले जाते. सोशिक आणि आदर्श सून म्हणून त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण झाली. अलका कुबल यांचा आज वाढदिवस. या निमित्ताने सिनेसृष्टीतील अनेक कलाकार त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. नुकतंच आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळीनी एक पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत त्यांनी त्याला फार हटके कॅप्शनही दिले आहे. यात त्यांनी अलका कुबल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : “अंगात ताप होता, बसताही येत नव्हतं तरी…” ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळींची पोस्ट

“अलकाताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”

अलकाताई म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील झाशीची राणी,
माहेरची साडी लेक चालली सासरला यात सोशिक आपला नारी ची भूमिका करणारी अलकाताई, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये त्या दबंग आहे, वाघीण आहे त्या वाघीण, कोणाचेही बापाला न घाबरणारी, चांगल्याशी खूपच चांगलं आणि वाईट अशी एकदम वाईट,
आपल्याला मोठी बहीण असली की कसा तिचा आधार वाटतो आपल्याला, मलाही या रूथलेस Ruthless फिल्म इंडस्ट्रीमध्ये अलकाताईचा खूप आधार मिळाला आहे,

असंख्या सिनेमांमध्ये आम्ही एकत्र काम केलं, समीर आणि त्यांच्या होम प्रोडक्शन मध्ये घरचा माणूस म्हणून त्यांनी मला सतत घेतलं,
या फिल्म इंडस्ट्री मध्ये खूप कमी माणसं आपली फॅमिली होतात,. अलकाताई माझी फॅमिली आहे.
आज अलकाताईंच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “दिघे साहेबांना भेटायचं भाग्य मला दोन वेळा लाभलं…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धने सांगितल्या खास आठवणी

दरम्यान ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मराठी मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद असतो. स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका नेहमीच टीआरपीमध्ये टॉपला असते. लेखन आणि अभिनय या दोन गोष्टींमुळे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते मिलिंद गवळी हे अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारतात. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aai kuthe kay karte fame milind gawali birthday wish to actress alka kubal nrp

ताज्या बातम्या