छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. अल्पावधीतच या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत दीपा आणि कार्तिक या जोडीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. या मालिकेत दिपा आणि कार्तिकच्या दोन्ही मुली दीपिका आणि कार्तिकी या चांगल्याच प्रसिद्धीझोतात आल्या आहेत. दीपिका आणि कार्तिकी या दोघींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र कार्तिकीची भूमिका साकारणारी बालकलाकार साईशा भोईर हिने मालिका सोडली आहे. त्यामुळे तिच्या जागी आता नव्या कार्तिकीची एंट्री होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिकीची भूमिका ही चांगलीच चर्चेत होती. या मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणारी साईशा भोईर हिने या मालिकेला रामराम केला आहे. त्यामुळे आता साईशा भोईर ऐवजी नवीन कार्तिकी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बालकलाकार मैत्रेयी दाते ही या मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणार आहे. नुकतंच तिचे कार्तिकीच्या वेशातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘रंग माझा वेगळा’मधील कार्तिकी फेम साईशा भोईरनं सोडली मालिका, कारण देताना म्हणाली “मला खूप…”

नुकतंच मैत्रेयीचे कार्तिकीच्या वेशातील काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यात तिने दोन वेण्या आणि फ्लोरल प्रिंट असलेला ड्रेस परिधान केला आहे. यात मैत्रेयीसोबत दीपिका अर्थात स्पृहा दळीही दिसत आहे.

सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर असल्याचे पाहायला मिळत आहे. दीपा आणि कार्तिक यांच्यामधील तणाव वाढला असून दीपा त्याला मंगळसूत्र देखील परत करत असल्याचे नुकतंच व्हायरल होत असलेल्या प्रोमोतून समोर येत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दीपिका आणि कार्तिकी यांच्याभोवतीही बऱ्याचदा मालिकेचे कथानक फिरताना दिसत होते. मात्र साईशाने अचानक मालिका सोडल्यानंतर कार्तिकीची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र आता कार्तिकीची भूमिका मैत्रेयी साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपिका आणि कार्तिकी एका भागासाठी घेतात इतके मानधन? जाणून घ्या

मैत्रेयी दाते ही याआधी काही जाहिराती आणि बालनाट्यांमध्ये काम केलं आहे. स्पृहा आणि मैत्रेयीचे फोटो पाहता मालिकेच्या सेटवर या दोघींची सुरुवातीपासूनच गट्टी जमल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi serial rang maza vegla maitreyee date will play kartiki after saisha bhoir left the show nrp