Video: मायरा वायकुळलाही पडली 'पठाण'ची भुरळ, चित्रपटाच्या 'या' गाण्यावर जबरदस्त डान्स spg 93 | mayara waykul dancing on pathaan films jhoome jo pathaan song video viral | Loksatta

Video: मायरा वायकुळलाही पडली ‘पठाण’ची भुरळ, चित्रपटाच्या ‘या’ गाण्यावर जबरदस्त डान्स

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून मायराने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं

mayara waykul
फोटो सौजन्य :लोकसत्ता ग्राफिक टीम

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतलेल्या शाहरुखला पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करत आहेत. यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेला हा बिग बजेट व तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. चित्रपटांप्रमाणेच यातील गाणीदेखील सुपरहिट ठरली आहेत. ‘झुमे जो पठाण’ हे गाणे चांगलेच गाजत आहे. यावर अनेकांनी रिल्स बनवली आहेत. आता प्रेक्षकांची लाडकी मायरादेखील यावर थिरकली आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून मायराने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि सर्वांची शाबासकी मिळवली. तिचा निरागसपणा प्रेक्षकांना भावला. तिचे आई-वडील सोशल मीडियावरून मायराबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांची शेअर करत असतात. नुकताच तिने ‘पठाण’ चित्रपटातील ‘झुमे जो पठाण’ या गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे. मायराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीदेखील यावर कमेंट्स केल्या आहेत.

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याशी नातं, करिअरमध्ये सलमानचा ‘तो’ सल्ला; कियारा अडवाणीबद्दलच्या ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत का?

‘पठाण’ चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक नवे विक्रम रचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाने भारतात ५०० कोटींचा टप्पा गाठला आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते ‘पठाण’ने आता जगभरात ८०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर, देशात ५०० कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने प्रदर्शनाच्या १२व्या दिवसापर्यंत इतकी कमाई केली आहे.

दरम्यान, शाहरुख खान, दीपिका पदुकोण व जॉन अब्राहम यांच्या भूमिका असलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. प्रदर्शनाच्या १३ दिवसानंतरही चित्रपट चांगली कमाई करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 20:10 IST
Next Story
“माझ्या आईचं निधन झालं, तेव्हा आदिल गर्लफ्रेंडबरोबर…”, राखी सावंतचा खळबळजनक खुलासा