-
बॉलिवूडमधील लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडपं कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा अखेर विवाह बंधनात अडकणार आहेत. ‘शेरशहा’ चित्रपटाच्या दरम्यान दोघांची भेट झाली आणि त्यांचे प्रेमप्रकरण सुरु झाले
-
कियारा अडवाणीने अवघ्या काही वर्षांच्या करिअरमध्ये बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावले आहे. तिच्याबद्दलच्या गोष्टी आपण जाणून घेऊयात.
-
कियाराचे खरे नाव आलिया आहे, तिने खुलासा केला की तिचा पहिला चित्रपट ‘फगली’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी तिने आपले नाव बदलून कियारा असे ठेवले.
-
‘दबंग’ अभिनेता सलमान खानने तिला तिचे नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. कारण आलिया भट्ट ही आधीच बॉलिवूडमध्ये दाखल झाली होती.
-
कियारा अडवाणीचे ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. तिने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
-
ती असं म्हणाली होती माझी आजी ही अशोक कुमारांची मुलगी आहे तसेच माझ्या आजोबांचा भाऊ सईद जाफरी आहे. पण खेदाची गोष्ट म्हणजे मी या दोघांनाही कधीच भेटले नाही.
-
अभिनेत्री जुही चावला बरोबरच्या नात्यावर ती असं म्हणाली होती, माझे आई-वडील काही अभिनेत्यांचे बालपणीचे मित्र आहेत. जुही माझ्या वडिलांची बालपणीची मैत्रिण आहे.
-
कियाराचा जन्म मुंबईतला असून तिने जय हिंद कॉजेमधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे.
-
‘कबीर सिंग’, ‘शेरशहा’, ‘भूलभुलैया २’,’ लक्ष्मी’ यासांरख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे तसेच तिने दक्षिणेतदेखील काम केले आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
