सर्वाधिक चर्चेत असलेली अडल्ट स्टार म्हणून मिया खलिफाला ओळखले जाते. मिया खलिफा सध्या सोशल मीडियावरील इन्फ्लूएन्सर म्हणून जगभरामध्ये ओळखली जाते. सध्या ती पॉर्न इंडस्ट्रीतून दूर असली तरी तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. मियाने नुकतंच टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मियाने तिचे स्तन हे बनावट असल्याचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे ब्रेस्ट ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी तिने लाखो रुपये खर्च केल्याचेही तिने सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिया खलिफाचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. बुधवारी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओत ती तिच्या होणाऱ्या मुलीसोबत संवाद साधताना दिसत आहे. मिया ही २८ वर्षांची आहे. यात तिची होणारी मुलगी तिला तिच्या सौंदर्याबद्दल, शरीराबद्दल अनेक प्रश्न विचारताना दिसत आहे.

यावेळी तिची होणारी मुलगी तिला म्हणते, आई मला मोठं झाल्यावर अगदी तुझ्यासारखे दिसायचे आहे. यावर उत्तर देताना मिया म्हणते, जर तुला आईसारखं दिसायचं असेल. तिच्यासारखे सौंदर्य हवे असेल तर तुला लाखो रुपये खर्च करावे लागतील.

तुझ्या आईने तिच्या स्तनासाठी १३ हजार डॉलर म्हणजेच जवळपास ९ लाख ९० हजार रुपये खर्च केले आहेत. तर नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी १५ हजार डॉलर म्हणजेच ११ लाख रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे तू आतापासूनच बचत करायला सुरुवात करणे सुरु कर, असा सल्ला मियाने दिला.

या व्हिडीओत मिया खलिफाने तिचे ब्रेस्ट खोटे असल्याचा अप्रत्यक्षरित्या खुलासा केला आहे. तिचे हे वक्तव्य ऐकून तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. मियाचा हा व्हिडीओ पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहे. तसेच अनेकांनी मियाचे स्तन बनावट असल्याचे माहिती नव्हते असेही सांगितले आहे.

दरम्यान तिच्या या खुलाशानंतर अनेकजण तिला तू स्तन आणि नाकाच्या शस्त्रक्रियेवर इतका खर्च कसा केलास? असा प्रश्न विचारत आहे. काही वर्षांपूर्वी याबाबत तिने स्वत:च खुलासा केला होता. तर तिने स्वतः एका मुलाखतीत सांगितले की, मी केवळ पॉर्न फिल्म्समधून १२ हजार डॉलर्स (९ लाख रुपये) कमावले होते.

२०१४-१५ दरम्यान मियाने तीन महिन्यांसाठी पॉर्न इंडस्ट्रीत काम केलं होतं. तीन महिन्यांच्या या कारकिर्दीमुळे आयुष्यभरासाठी आपल्यावर पॉर्नस्टार असल्याचा ठपका बसल्याची खंत तिने या मुलाखतीमध्ये बोलून दाखवली होती.

‘मी वयाच्या २१ व्या वर्षी या क्षेत्रात आले. त्यावेळी हे व्हिडीओ इतके लोकप्रिय होतील असं मला वाटलं नव्हतं. हे माझं एक डर्टी सिक्रेट असेल असं मला वाटलेलं. कारण या क्षेत्रात अनेक तरुणी काम करतात पण प्रत्येकीला लोकं ओळखत नाहीत. दुर्देवाने माझ्याबद्दल तसे झाले नाही. आज ते क्षेत्र सोडून मला चार वर्षांहून अधिक काळ झाला आहे. तरी लोकं मला पॉर्नस्टार म्हणूनच ओळखतात. माझ्या घरच्यांनी माझ्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क ठेवलेले नाही,’ अशी खंत मियाने बोलून दाखवली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mia khalifa reveals her breasts are fake and she has spent 13000 dollars for implant nrp