‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. तिचे फॅशन सेन्स आणि ड्रेस नेहमीच चर्चेत असतात. उर्फी ही तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद ही सातत्याने चर्चेत आहे. चित्रा वाघ यांच्याबरोबर झालेल्या वादामुळे उर्फीबद्दल प्रत्येकालाच कुतूहल वाटतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या मात्र उर्फीचा अंदाज थोडा बदलल्यासारखा वाटत आहे. नुकतंच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची माफी मागितली आहे. उर्फी ट्वीट करत म्हणाली, “मी ज्या प्रकारचे कपडे परिधान करते त्यामुळे बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या आहेत त्याबद्दल मी त्यांची माफी मागते. यापुढे तुम्हाला उर्फीमध्ये आमूलाग्र बदल दिसेल.”

आणखी वाचा : ‘हेरा फेरी’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी सुरुवातीला फिरवलेली पाठ पण… जाणून घ्या नेमकं काय घडलं?

तिच्या या ट्वीटचं तिच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे. लोकांनी तिच्या आत्मविश्वासाची दाद दिली आहे. तर काही लोकांनी कॉमेंट करत उर्फी आपल्याला एप्रिल फूल बनवत आहे असं लिहिलं आहे. ३१ मार्चला तिने हे ट्वीट केल्या बऱ्याच लोकांचा असा दावा आहे की उर्फीने सगळ्यांना एप्रिल फूल केलं आहे.

या ट्वीट पाठोपाठ एका कपड्याच्या ब्रॅंडच्या जाहिरातीत उर्फीला घेण्यात आलं आहे. ही जाहिरात १ एप्रिलला लॉंच होणार आहे. याची टॅगलाइनदेखील उर्फीच्या बोल्ड अंदाजासारखी आहे ती म्हणजे, “मी ट्रेंड फॉलो करत नाही, मी ट्रेंड सेट करते. एक वेगळं बोल्ड आणि असामान्य असं कपड्यांचं कलेक्शन लवकरच येणार तुमच्या भेटीला.” या जाहिरातीमुळे उर्फीचं हे ट्वीट एक पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हंटलं जात आहे. नुकतंच अभिनेत्री करीना कपूरनेदेखील उर्फीच्या या बोल्ड अंदाजाची आणि बेधडक स्वभावाची प्रशंसा केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Model actress urfi javed apologises for her weird fashion sense which hurt peoples sentiments avn