जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या मुकेश अंबानी व नीता अंबानींची मुलगी ईशा काही महिन्यांपूर्वीच आई झाली. १९ नोव्हेंबरला ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला. ईशाने मुलाचे नाव कृष्णा तर मुलीचे नाव आदिया असं ठेवलं आहे. आता मुकेश व नीता अंबानी यांनी त्यांच्या या दोन नातवंडांना खास भेट पाठवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुन्हा एकदा आजी-आजोबा झालेल्या मुकेश अंबानी व नीता अंबानींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सध्या ईशा तिच्या दोन्ही मुलांना घेऊन भारतात राहत आहे. तर मुकेश आणि नीता अंबानी आपला नातवंडांबद्दल वाटणारं प्रेम विविध प्रकारे व्यक्त करत आहेत. आता आपल्या दोन्ही नातवंडांना त्यांनी एक मोठी भेट दिली आहे.

आणखी वाचा : अनंत अंबानीने साखरपुड्यात घातला होता ‘कार्टियर पँथर ब्रोच’, किंमत वाचून व्हाल आवाक्

मुकेश व नीता अंबानी यांनी आपल्या नातवंडांना एक अतिशय महागडं कस्टमाईझ कपाट भेट म्हणून दिलं आहे. पिवळ्या रंगाचं हे सुंदर कपाट ५ फूट उंच आहे. तर त्यात हॉट एअर बलून, ढग, विमान अशा विविध गोष्टींनी सजवलेला सुंदर वॉलपेपरही लावला आहे. त्याचबरोबर त्या कपाटात रंगीबेरंगी फुलं, टेडी, पृथ्वीचा गोल, २ पासपोर्ट्स देखील ठेवले आहेत. तर त्याच्या खालच्या बाजूला ६ ड्रॅावर्स आहेत. या कपाटावर ‘ॲडवेंचर्स ऑफ आदिया अँड कृष्णा’ असं सोनेरी अक्षरात लिहिलेलं आहे.

हेही वाचा : लग्न सिद्धार्थ-कियाराचं पण चर्चा ईशा अंबानीच्या साधेपणाची, विवाहसोहळ्यातील Unseen Photo व्हायरल

हे कपाट तयार करणाऱ्या गिफ्ट कंपनीने याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आता हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून ईशाच्या दोन्ही मुलांसाठी मुकेश व नीता अंबानी यांनी दिलेली ही खास भेट खूप चर्चेत आली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh and neeta ambani gifted luxurious customizable cupboard to isha ambani children rnv