‘शक्तिमान’ आता मोठ्या पडद्यावर, सुपरहिरोच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्याला ऑफर

मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’ या बिग बजेट सिनेमाची घोषणा केली होती.

ranveer singh-mukesh khanna-shaktiman

९०च्या दशकात छोट्या पडद्यावर बोलबाला असलेला शो म्हणजे ‘शक्तिमान’. लहानगेच नाही तर अगदी थोरा मोठ्यांना देखील या शोने भुरळ घातली होती. ९०च्या दशकातील ‘शक्तिमान’ या भारतीय सुपरहिरोने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. त्यानंतर यावर्षाच्या सुरुवातीलाच ‘शक्तिमान’ मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या बिग बजेट सिनेमात रणवीर सिंह सुपुरहिरोच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

२०२२ या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘शक्तिमान’ म्हणून घराघरात पोहचलेल्या मुकेश खन्ना यांनी सिनेमाची घोषणा केली होती. भारतातील पहिल्या सुपुरहिरोवर म्हणजेच ‘शक्तिमान’वर एक बिग बजेट सिनेमा तयार करत असल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर आता सिनेमात सुपरहिरोच्या भूमिकेसाठी रणवीर सिंह झळकण्याची चर्चा रंगू लागलीय.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार फिल्म मेकर्सनी रणवीर सिंहला शक्तिमानच्या भूमिकेसाठी ऑफर दिली आहे. रणवीरने अद्याप ही ऑफर स्विकारली नसली तरी या सिनेमाबद्दल उत्सुक असल्याचं तो म्हणालाय. वृत्तानुसार ‘रणवीरने या भूमिकेसाठी उत्सुकता दर्शवली आहे. तर मेकर्सनाही रणवीर शक्तिमानची भूमिका उत्तम पार पाडेल असा विश्वास आहे. या भूमिकेसाठी रणवीर आणि मेकर्समध्ये चर्चा सुरु आहे.’

दरम्यान, रणवीर लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात आलिया भट्टसोबत झळकणार आहे. तसंच रोहित शेट्टीच्या सर्कस आणि सिंबा २ मधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mukesh khanna offer ranveer singh superhero in shaktiman movie kpw

Next Story
Video: ‘तमाशा Live’ च्या टीमसोबत धमाल गप्पा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी