music composer ajay and atul gogavale gives chance to viral video school student sing a song in movie | Loksatta

Viral Video मुळे फेमस झाला अन् अहमदनगरच्या शाळकरी मुलाला अजय-अतुलने दिली थेट चित्रपटात गाण्याची संधी

काही दिवसांपूर्वी ‘चंद्रा’ हे गाणं गाणाऱ्या एका शाळकरी मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या मुलाला अजय-अतुल यांनी चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे.

Viral Video मुळे फेमस झाला अन् अहमदनगरच्या शाळकरी मुलाला अजय-अतुलने दिली थेट चित्रपटात गाण्याची संधी
अजय-अतुलने शाळकरी मुलाला चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे. (फोटो : अजय-अतुल/ इन्स्टाग्राम)

कलाविश्वातील अजय-अतुल ही लोकप्रिय जोडी आहे. त्यांची गाणी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावतात. केवळ मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी गाण्यांमुळे प्रेक्षकांना भुरळ घातली. सध्या अजय-अतुल गाण्यामुळे नाही तर त्यांच्या कृतीमुळे चर्चेत आहेत.

काही दिवसांपूर्वी ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ हे गाणं गाणाऱ्या एका शाळकरी मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये तो मुलगा आपल्या मधूर आवाजात ‘चंद्रा’ हे गाणं गाताना दिसत होता. जयेश खरे असं त्या शाळकरी मुलाचं नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यात राहणारा आहे. सुमधूर आवाजातील गाणं गातानाचा त्याचा व्हिडीओ अजय-अतुल यांच्यापर्यंत पोहोचला. त्याच्या आवाजाने अजय-अतुल यांनाही भुरळ पाडली आहे. जयेशला अजय-अतुल यांनी चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे.

हेही वाचा >> “लोकलमध्ये मी नेलपेंट, लिपस्टिक विकायचे अन्…”, विशाखा सुभेदारने शेअर केल्या खडतर प्रवासातील आठवणी

हेही वाचा >> “लग्न करायचे म्हणून तो रोज माझ्या घरी…”, रिंकूने सांगितला ‘त्या’ चाहत्याचा भयानक किस्सा

अजय-अतुलने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जयेशबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “रसिकहो, तुमच्यामुळे आम्हाला अस्सल मातीतला कलाकार सापडला…!!! ही आहे आजच्या महाराष्ट्राची ताकद, सर्वांचे मनापासून आभार”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये जयेश अजय-अतुल यांच्यासह गाणं रेकॉर्ड करताना दिसत आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात गाणं गाण्याची संधी अजय-अतुलने जयेशला दिली आहे.

हेही वाचा >> “ती माझ्या आयुष्यात आली आणि…”, अभिनेता संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. “हा अस्सल मातीतला कलाकार viral video ने सापडतो. आणि थेट अजय अतुल यांच्यापर्यंत पोहोचतो. ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमासाठी त्याचं गाणं रेकॉर्ड होतं. इतिहास असाच लिहिला जातो. महाराष्ट्र शाहीर…२३ एप्रिल २०२३…!”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत अजय-अतुल यांच्यावर  कौतुकांचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अभिनेत्री अर्चना पूरण सिंग यांनी व्यक्त केली मनातील खदखद, म्हणाल्या “अजूनही मला तशाच भूमिका…”

संबंधित बातम्या

“आरडाओरड करणाऱ्या लोकांमध्ये तो कायम…” रवीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर मराठी लेखकाची तिरकस पोस्ट
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
हॉलिवूडमधील महागडा घटस्फोट! अभिनेत्री किम कार्दशियनला कान्ये वेस्ट महिन्याला देणार तब्बल ‘इतके’ कोटी रुपये
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
“आपण जे बघतो त्यावर…” मानसी नाईकच्या गंभीर आरोपांवर पतीचे सडेतोड उत्तर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“MPSC त उत्तीर्ण नाही झाला तरी गावाकडे…”, गोपीचंद पडळकरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
पुण्यातून व्यापाऱ्याचे अपहरण करणारा आरोपी राजस्थानमध्ये जेरबंद; प्रेमसंबंधातून अपहरणाचा प्रकार
शाहरुख खानने दिली मक्का मशिदीला भेट, प्रार्थना करतानाचे फोटो व्हायरल; कारण आहे एकदम खास
PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या, रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने केले सात विश्वविक्रम
पुणे: कात्रज प्राणी संग्रहालयातील गव्याचा मृत्यू