साउथ फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनताराने बॉयफ्रेंड विग्नेश शिवनसोबत साखरपुडा केल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहेत. नयनताराच्या हातावर साखरपुड्याची अंगठी आणि बॉयफ्रेंड विग्नेश शिवनने शेअर केलेला फोटो त्यांच्या साखरपुड्याचाच इशार देत होते. अखेर अभिनेत्री नयनताराने या चर्चांवर पूर्णविराम देत साखरपुडा झाल्याची कबुली दिलीय. अभिनेत्री नयनतारा ही सध्या तिच्या ‘नेत्रिकन्न’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने साखरपुडा झाल्याची कबुली दिली आहे. तसंच बॉयफ्रेंड विग्नेश शिवने तिला गिफ्ट केलेल्या अंगठीबद्दल देखील बोलताना ती दिसून आली.
साउथची लेडी सुपरस्टार नयनतारा आणि बॉयफ्रेंड विग्नेश शिवन यांच्या साखरपुड्याचा विषय सध्या टॉलिवूडसह बॉलिवूडमध्ये सुद्धा हॉट टॉपिक आहे. नयनतारा आणि विग्नेश २०१५ पासून एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर दोघंही त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने व्यक्त होताना दिसतात. दोघं अनेकदा रोमँटिक फोटो पोस्ट करतात. विग्नेशनने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये नयनताराच्या हातावर साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळाली. यासोबतच विग्नेशने तामिळ भाषेत कॅप्शन देताना लिहिलं होतं की, ‘मी माझं आयुष्य तुझ्या हातात देत आहे’. त्यावरून या दोघांनी साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर अनेक दिवसांच्या चर्चानंतर नयनताराने साखारपुडा झाल्याचं कबुल केलंय.
अभिनेत्री नयनताराने तिच्या आगामी ‘नेत्रिकन्न’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत नयनताराला तिच्या हातावरील अंगठीबाबत विचारले असता ती म्हणाली, “ही माझ्या साखरपुड्याची अंगठी आहे.” इतकं बोलून ती दुसऱ्या विषयावर बोलताना दिसून आली. ही मुलाखत येत्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता ऑन-एअर होणार आहे. याचा एक प्रोमो चॅनलने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केलाय. या प्रोमोच्या शेवटी नयनतारा तिच्या बॉयफ्रेंड विग्नेशबद्दल बोलताना त्याच्यातील चांगल्या आणि वाईट गोष्टी शेअर करताना दिसून आली.
Lady SuperStar நயன்தாரா – வரும் ஞாயிறு காலை 10:30 மணிக்கு நம்ம விஜய் டிவில.. #LadySuperstarNayanthara pic.twitter.com/TmY15QeVZ9
— Vijay Television (@vijaytelevision) August 10, 2021
नयनताराने साखरपुड्याची कबुली दिल्यानंतर चाहते आता तिच्या लग्नासाठी उत्सुक झाले आहेत. नयनतारा आणि विग्नेश यांची पहिली भेट ‘नानुम राऊडी धान’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या सेटवर झाली. याआधी प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक प्रभूदेवासोबत नयनताराचे प्रेमसंबंध असल्यांच्या बातम्या समोर येत होत्या. असंही म्हटल जातं की, प्रभास आणि नयनतारा लिव्ह-इनमध्येही राहत होते. प्रभुदेवाने तिच्याशी लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीला घटस्फोट देखील दिला.
विग्नेश शिवनला ती डेट करत असून त्याच्यासोबतचे फोटो ती अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता नुकत्याच पोस्ट केलेल्या एका फोटोतून नयनताराने साखरपुड्याचा इशारा दिला आहे. या फोटोमध्ये नयनताराच्या हातावर साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळतेय. विग्नेशनेही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने तामिळ भाषेत कॅप्शन लिहिलं आहे. ‘मी माझं आयुष्य तुझ्या हातात देत आहे’, असं या कॅप्शनचा अर्थ होतो. त्यावरून या दोघांनी साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.