बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. वेगवेगळ्या भूमिका साकारत त्यांनी आजवर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय. त्याचसोबत नीना गुप्ता त्यांच्या बिनधास्त अंदाज आणि बेडधक व्यक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. समाजातील विविध मुद्यांवर त्या स्पष्ट मत मांडताना दिसता. नीना गुप्ता त्यांच्या पर्सनल लाईफमुळे देखील अनेकदा चर्चेत येतात.

नुकताच नीना गुप्ता यांचा सरदार का ग्रॅण्डसन हा सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमाच्या निमित्ताने एका मुलाखतीत बोलताना नीना गुप्ता यांनी आयुष्यात एकेकाळी आलेल्या एकटेपणाबद्दल खुलासा केला आहे. आरजे सिद्धार्थ मेननला दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुत्पा यांनी त्यांना एकटेपणाचा अनेकदा संघर्ष करावा लागल्याचं सांगितलं आहे. एकटेपणाबद्दल त्या म्हणाल्य़ा, ” माझ्या आयुष्यात हे बऱ्याचदा झालंय. कारण अनेक वर्ष माझ्या आयुष्यात कुणी बॉयफ्रेण्डही नव्हता आणि पतीही नव्हता. खरं सांगू तर तेव्हा माझे वडिलच माझा बॉयफ्रेण्ड होते. ते आमचे फॅमिली मॅन होते. मला खूप त्रास व्हायचा जेव्हा शूटिंगच्या सेटवर माझा अपमान केला जायचा. मी अनेकदा एकाकीपणाचा सामना केलाय. मात्र देवाने मला शक्ती दिलीय ज्यामुळे मी कायम पुढे जात राहिली. मी कधी भूतकाळात डोकावून पाहत नाही.” असं त्या म्हणाल्या.

नीना गुप्ता या वेस्टइंडीजचे क्रिकेटर विवयन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होत्या. नीना आणि विवयन यांची मुलगी मसाबा सध्या एक फॅशन डिझायनर आहे. विवियनसोबत नीना गुप्ता यांचं नातं फार काळ टिकलं नाही. मसाबाच्या जन्मानंतर त्यांच ब्रेकअप झालं. त्यानंतर २००८ साली नीना गुप्ता यांनी विवेक मेहरा यांच्याशी विवाह केला.

नुकताच एका मुलाखतीत नीना यांनी लॉकडाउनमध्ये पहिल्यांदा पती विवेक मेहरा यांच्यासोबत सर्वाधिक वेळ घालवला असल्याचा खुलासा केला होता. नीना गुप्ता मुंबईत राहतात तर विवेक मेहरा दिल्लीत. मात्र गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये दोघांनी सहा महिने मुक्तेश्वरमध्ये एकत्र वेळ घालवला. नीना म्हणाल्या, “तर असं पहिल्यांदा झालं लॉकडाउनमध्ये आम्ही एवढे दिवस एकत्र राहिलो. पहिल्यांदा ते मला समजू शकले आणि मी त्यांना” असं नीना गुप्ता म्हणाल्या.

वाचा: “किती लाजिरवाणं”; वादळात पडलेल्या झाडांसमोर डान्स केल्याने अभिनेत्री दीपिका सिंह ट्रोल

दरम्यान नुकत्याच रिलीज झालेल्या ‘सरदार का ग्रॅण्डसन’ या सिनेमात नीना गुप्तांची मुख्य भूमिका आहे. या सिनेमात त्या एका ९० वर्षीय आजीची भूमिका साकारत असून तिचं नावं सरदार कौर आहे. या सिनेमाला आणि नीना गुप्ता यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय.