नेहा कक्कर हे नाव साऱ्यांनाच परिचित आहे. आपल्या गोड आवाजाच्या जोरावर नेहाने कलाविश्वात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कायमच चाहत्यांमध्ये नेहाची चर्चा रंगत असते. मात्र, आता नेहाने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ती चर्चेत आली आहे.

नेहाचा हा व्हिडीओ बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.  नेहा तिचा पती आणि रोहनप्रीतसोबत मुंबई विमानतळावर दिसली. त्यावेळी नेहाने गडद निळ्या रंगाचं टीशर्ट आणि काळ्या रंगची पॅंट परिधान केली होती. तर रोहनप्रीतने कलरफूल शर्ट आणि शॉर्टस परिधान केली होती. सगळ्यांच लक्ष नेहाच्या टीशर्टने वेधले आहे. नेहाने GUCCI च टीशर्ट परिधान केलं होतं. या साध्या टीशर्टची किंमत ५९० डॉलर म्हणजेच ४२ हजार रूपये एवढी आहे.

लवकरच नेहाच एक नवीन गाणं प्रदर्शित होणार आहे. या गाण्यात ‘बिग बॉस १४’ या पर्वातील लोकप्रिय जोडी अभिनव शुक्ला आणि रूबीना दिलैक दिसणार आहेत. या गाण्याचा पोस्टर नेहाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “मला विश्वास आहे की तुम्हाला सगळ्यांना हे गाणं आवडेल” अशा आशयाचे कॅप्शन नेहाने ते पोस्टर शेअर करत दिले आहे.

नेहा आणि रोहनप्रीत यांच लग्न गेल्या वर्षी झालं. नेहाने सुरूवातीला तिच्या गाण्याच्या व्हिडीओमुळे सगळ्यांना गोंधळात टाकले होते की नक्की त्यांच लग्न होणार आहे की फक्त गाणं आहे. मात्र, त्यानंतर या दोघांनी लग्न केले.