बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोरा तिच्या बोल्ड फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. नोरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत नोरा चाहत्यांच्या संपर्कात राहते. नोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी नोराला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे.
नोराचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावलाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत नोराने काळ्या रंगाचा हॉल्गर नेकचा ड्रेस परिधान केला आहे. नोराच्या हातात काळ्या रंगाची एक बॅग आहे. नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : पतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली ‘ही’ विनंती
आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”
नोराचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘ती दररोज अशी उभी कशी राहू शकते?’. दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तिच्या पॉश्चरमध्ये काही गडबड आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हीला हाडांच्या डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे’,अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी नोराला ट्रोल केले आहे. दरम्यान, लवकरच नोरा लोकप्रिय अभिनेता अजय देवगणच्या ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ आणि ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.