छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निया शर्मा आपल्या बोल्ड लूक्ससाठी आणि घायाळ करणाऱ्या अदाकारीसाठी प्रसिद्ध आहे. पण या व्हिडिओत तुम्हाला तिची झालेली फजिती पाहायला मिळणार आहे. स्वतः नियाने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
अभिनेत्री निया शर्माने आपल्या ऑफिशिय़ल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती एक पाण्यातला खेळ खेळताना दिसत आहे. हा खेळ आहे जेट ब्लेडिंग. या व्हिडिओत ती आपला तोल सांभाळत हा खेळ खेळताना दिसत आहे. मात्र एका बेसावध क्षणी तिचा तोल जाऊन ती धपकन पाण्यात कोसळली. ह्याचीही मजा घ्या असं म्हणत तिने चाहत्यांसोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर तिच्या चाहत्यांनीही कमेंट्स करत या व्हिडिओची मजा घेतल्याचं सांगितलं आहे.
निया सध्या जमाई राजा २.० या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतला तिचा सहकलाकार रवी दुबे याच्यासोबतचा एक व्हिडिओ काल तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ऑफ शोल्डर काळ्या गाऊनमध्ये निया फारच सुंदर दिसत आहे. रवी आणि नियाने मनमोहक असं नृत्य या व्हिडिओमध्ये केलं आहे आणि गाण्याचे बोलही अगदी चपखलपणे लिपसिंक केले आहेत.
नियाची जमाई राजा २.० ही मालिका सध्या झी ५ ऍपवर प्रसारित होत आहे. नियाने यापूर्वी याच मालिकेचा पहिला भाग असलेल्या जमाई राजा या मालिकेतही काम केलं आहे. त्याचबरोबर ती खतरों के खिलाडी या रिऍलिटी शोचाही भाग होती. एक हजारों मे मेरी बहना है या मालिकेतही तिने अभिनेत्री क्रिस्टल डिसूझासोबत काम केलं आहे.