माजी प्रियकर आणि व्यावसायिक भागीदार नेस वाडियाविरुद्ध जून महिन्यात पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने पाच अटी घातल्याच्या वृत्तात सत्यता नसल्याचे वाडिया समूहाच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले. मरिन ड्राईव्ह पोलीस स्थानकात दाखल केलेल्या लेखी तक्रारीत ३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर आयपीएल सामन्यादरम्यान नेस वाडियाने आपल्याशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचे अभिनेत्री प्रितीने म्हटले होते. अटीच्याबदल्यात तक्रार मागे घेण्याची चर्चा दोन्ही पक्षात झालेली नसल्याचे सांगत, या केवळ अफवा असून, त्यात काही तथ्य नसल्याचे वाडिया समूहाचा प्रवक्ता म्हणाला. दरम्यान, नेस वाडियातर्फे या प्रकरणी बोलाविण्यात आलेल्या नवीन चार साक्षीदारांनी त्या दिवशी दोघांमध्ये सर्व काही नेहमीप्रमाणेच होते असे सांगितल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2014 रोजी प्रकाशित
‘प्रिती झिंटाने पाच अटी लादल्याचे वृत्त असत्य’
माजी प्रियकर आणि व्यावसायिक भागीदार नेस वाडियाविरुद्ध जून महिन्यात पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने पाच अटी...
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 05-09-2014 at 07:41 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No truth in preity zintas five conditions story ness wadias spokesperson