अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीने तिच्या डान्स आणि ग्लॅमरस अदांनी आजवर अनेकांना घायाळ केलंय. नोराचा ग्लॅमरस लूक आणि तिचा दमदार डान्स यावर अनेकजण फिदा आहेत. नोरा सध्या डान्स दीवाने या शोमध्ये जजच्या भूमिका साकारतेय. या शोमध्ये देखील अनेकदा नोराच्या डान्सचा जलवा पाहायला मिळतो.

सध्या या शोमधील नोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात नोरा एका स्पर्धकासोबत लावणी करताना दिसतेय. कलर्स टीव्हीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शोमधील स्पर्धक सूचनाने जबरदस्त लावणी केली आहे. नोरासह सगळ्याच परिक्षकांना ही लावणी प्रचंड आवडली. त्यानंतर नोराला देखील लावणी करण्याचा मोह आवरला नाही.

नोरा फतेहीने सूचना सोबत लावणीचा ठेका धरला. तो देखील नोराच्या हाय गर्मी या गाजलेल्या गाण्यावर. हाय गर्मी या गाण्यावर नोराने जबरदस्त लावणी करत शोमधील सर्वांची मनं जिंकली आहेत. तर नेटकऱ्यांना देखील नोराच्या लावणीने भुरळ घातलीय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

कलर्सने ” नोराला लावणी करताना पाहायचंय का? मग सूचना आणि नोराची लावणी पहा” असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केलाय.

नोरा लवकरच अजय देवगणच्या ‘भुजः द प्राइड इंडिया’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.