भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच आणखी एका अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ओडिशातील गायिका व अभिनेत्री रुचिस्मिता गुरुचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ती तिच्या नातेवाईकाच्या घरी मृतावस्थेत आढळल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“तुझं सगळ्यात मोठं खोटं…” ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा घटस्फोट होणार? पत्नीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

‘अमर उजाला’ने दिलेल्या वृत्तानुसार, रुचिस्मिता बलांगीर शहरातील तलपालीपारा इथली रहिवासी होती. तिने अनेक म्युझिक अल्बलममध्ये अभिनय केला होता. तसेच तिने अनेक गाणीही गायली होती. ती स्टेज शोदेखील करायची. रुचिस्मिता २६ मार्च २०२३ रोजी रविवारी रात्री पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच बलांगीर पोलीस घटनास्थळी पोहोचले. आलू पराठा बनवण्यावरून मायलेकीत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

रुचिस्मिताच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, “मी रात्री साडेआठ वाजता तिला आलू पराठा बनवण्यास सांगितलं होतं, पण ती म्हटली की रात्री १० वाजता बनवेल, त्यानंतर आमच्यात भांडण झालं.” दरम्यान, अभिनेत्रीने यापूर्वी काही वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशीही माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odia actress singer ruchismita guru died by suicide at relative home hrc