‘असुर’ या वेब सीरिजचे दुसरे पर्व तब्बल तीन वर्षांनी १ जून रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळाले. पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसऱ्या पर्वाचीही जोरदार चर्चा होती, या सीरिजच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. १५ दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजची चांगलीच चर्चा होत आहे. या सीरिजमध्ये मराठमोळा अभिनेता अमेय वाघची महत्त्वाची भूमिका होती. त्याने यामध्ये रसूल नावाचं पात्र साकारलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शशांक केतकरचा साताऱ्यातील वडिलोपार्जित वाडा पाडून इमारत उभारली जाणार; अभिनेता भावुक होत म्हणाला, “खूप आठवणी…”

अमेय वाघने एका मुलाखतीत त्याच्यासाठी रसूलचं पात्र साकारणं किती अवघड होतं, याबद्दल खुलासा केला आहे. ‘इंडिया टुडे’शी बोलताना अमेय म्हणाला, “अभिनेता म्हणून शूटिंगवेळी ते पात्र साकारणं, अभिनय करणं आणि नंतर नॉर्मल होणं हे माझं काम असतं. पण असुरच्या शुटिंगवेळी मी नेहमीसारखा नव्हतो. थोडा विचित्र वागत होतो, पहिल्या सीझनमध्ये हे जास्त जाणवलं. कदाचित माझ्या पात्रामुळे असं झालं असावं.”

‘असु’र ही एक सायकोलॉजिकल थ्रिलर वेब सीरीज आहे. या सीरिजचे पहिले पर्व २ मार्च २०२० रोजी प्रदर्शित झाले होते. त्यानंतर आता सव्वातीन वर्षांनी १ जून २०२३ रोजी याचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या सीरिजमध्ये अर्शद वारसी, बरुण सोबती, रिद्धी डोगरा, अनप्रिया गोएंका, गौरव अरोरासह अनेक कलाकार होते.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amey wagh reveals he was unusual as rasool at asur sets hrc