Asur Season 2 update : २०२० मध्ये कोविडमुळे संपूर्ण जग ठप्प झालं आणि मनोरंजनसृष्टीलाही याचा चांगलाच फटका बसला. याचदरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रचंड सुळसुळाट झाला आणि याच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘असुर’ या वेबसीरिजची तेव्हा चांगलीच चर्चा झाली. सुरुवातीला या सिरिजला तसा थंड प्रतिसाद होता, पण नंतर हळूहळू ही वेबसीरिज प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सायको थ्रिलर या पठडीत मोडणारी अशी कथा तोवर कुणीच पाहिली नव्हती. तेव्हापासून या सिरिजच्या पुढच्या सीझनची चाहते आतुरतेने वाट बघत होते. अर्शद वारसी आणि बरुण सोबती या दोन्ही अभिनेत्यांच्या कामाची प्रचंड प्रशंसा झाली. आता मात्र ही प्रतीक्षा संपली आहे कारण लवकरच ‘असुर’चा सीझन २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा : “हात जोडून विनंती…” तरण आदर्श यांनी मांडलं बॉलिवूडमध्ये होणाऱ्या ‘रिमेक’बद्दल परखड मत

मध्यंतरी या सीरिजमधील अभिनेत्री रिद्धी डोग्रा हिने याबद्दल भाष्य केलं होतं, पण आता या सीरिजबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. ‘असुर’चा पहिला सीझन ‘वूट’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. आता मात्र याचा पुढील सीझन हा ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नुकतंच जिओने एका व्हिडिओमधून येणाऱ्या बऱ्याच वेबसीरिज आणि चित्रपटांबद्दल माहिती दिली. यात ‘असुर २’चा देखील समावेश आहे.

या व्हिडीओमध्ये ‘असुर’च्या दुसऱ्या सीझनची काही झलक पाहायला मिळाली आहे, पण अद्याप याचा टीझर किंवा ट्रेलर प्रदर्शित झालेला नाही शिवाय याच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दलही काही माहिती समोर आलेली नाही. हा दूसरा सीझन जून २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्यंतरी अर्शद वारसीनेसुद्धा याबद्दल भाष्य करताना तो या नव्या सीझनमधील नवीन आव्हानांसाठी प्रचंड उत्सुक असल्याचं स्पष्ट केलं होतं. या वेबसीरिजमध्ये अर्शद वारसी, वरुण सोबती, रिद्धी डोग्रा, आणि अनुप्रिया गोएंका हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arshad warsi most awaited web series asur season 2 will be streaming on this ott platform avn