शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र तो अभिनयातून नव्हे तर कॅमेऱ्याच्या मागे काम करून आपली जादू दाखवणार आहे. आर्यन एका वेब सीरिजचं दिग्दर्शन करत आहे, ज्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. लिखाणाचे काम पूर्ण झाले असून लवकरच याचे चित्रीकरणही सुरू होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता मीडिया रीपोर्टनुसार अशी माहिती समोर आली आहे की बॉबी देओल आर्यनच्या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी आर्यनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्याची रेड चिलीज एंटरटेनमेंटची एक स्क्रिप्ट दिसत होती. याच सीरिजमधून तो इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या मालिकेचे नाव ‘स्टारडम’ आहे. मात्र, अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आणखी वाचा : नेटफ्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राइम; कधी व कशावर पाहता येणार ख्रिस्तोफर नोलनचा ‘ओपनहायमर’?

आर्यनच्या या सीरिजबद्दलची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे. पण ‘इंडिया टुडे’च्या काही खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार खूप चर्चेनंतर आर्यनने या भूमिकेसाठी बॉबी देओलशी संपर्क साधला आहे. बॉबीने याआधीही रेड चिलीजबरोबर काम केलं आहे, अन् आर्यनच्या या नव्या प्रोजेक्टमध्ये काम करण्यास तो उत्सुक असल्याचं सांगितलं जात आहे.

या सीरिजमध्ये बॉबी एका वेगळ्याच अवतारात दिसणार आहे. बॉबीबरोबरच काही नवीन चेहऱ्यांनाही आर्यनने यात संधी दिल्याचं सांगितलं जात आहे. ही वेब सीरिज ६ एपिसोडची एक मिनी सीरिज असणार आहे. तसेच याच्याशी निगडीत काही डिटेल्स आर्यनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केल्या आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aryan khan going to cast boby deol as lead in his upcoming debut web series avn