ओटीटी प्लॅटफॉर्मची सर्वात जास्त चलती ही आपल्याच देशात आहे. कोविड काळानंतर ओटीटीवरील कंटेंट बघणाऱ्या लोकांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. असाच एक उत्तम आणि परवडणारा ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे एमएक्स प्लेअर. सुरुवातीला फक्त व्हिडिओ प्लेअर म्हणून वापरल्या जाणाऱ्या या प्लॅटफॉर्मचं रूपांतर भारतातील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कित्येक उत्तमोत्तम सीरिज या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्या. आता अशीच आणखी एक आगामी सीरिज या प्लॅटफॉर्मवर लवकरच येणार आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि तिथली गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ‘धारावी बँक’ या वेबसीरिजचा टीझर नुकताचा प्रदर्शित झाला आहे. ५० सेकंदाच्या या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन आपल्याला बघायला मिळत आहे.

आणखी वाचा : लेकाची नवी वेबसीरिज पाहण्यास जया बच्चन यांचा नकार; अभिषेक म्हणतो “यापेक्षा ती संसदेत…”

अंडरवर्ल्ड कनेक्शनच्या पलीकडे जाऊन ‘धारावी’ परिसरातील एक वेगळीच गोष्ट आपल्यासमोर या सीरिजमधून उलगडणार असल्याचं या टीझरवरुन स्पष्ट होत आहे. शिवाय अभिनेता सुनील शेट्टी या सीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे. गुन्हेगारी विश्वाचा सर्वेसर्वा ‘थलाईवन’ हे पात्र सुनील शेट्टीने साकारलं आहे. याबरोबरच विवेक ओबेरॉयसुद्धा यामध्ये जेसीपी जयंत गावस्कर या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

एकंदरच या सीरिजमधून एक वेगळं गुन्हेगारी विश्वातील एक वेगळं कथानक आपल्यासमोर उलगडेल असं या ट्रेलरवरुन जाणवत आहे. सुनील शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांच्याबरोबरीने सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, नागेश भोसले, चिन्मय मांडलेकरसारखे मराठी कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच या सीरिजचा ट्रेलरही प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor suniel shetty is ready for his ott debuet from webseries dharavi bank on mx player avn