सिनेरसिक ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटांची फारच आतुरतेने वाट पहात असतात. त्याच्या चित्रपटाची क्रेझ आपल्या भारतातही प्रचंड बघायला मिळते. नुकताचा त्याचा ‘ओपनहायमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. भारतात गेले काही दिवस या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. अणूबॉम्बचे जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतात या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून सामान्य प्रेक्षक, नोलनचे चाहते तसेच चित्रपट समीक्षक यांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. चित्रपटातील काही सीन्समुळे तसेच भगवद्गीतेच्या संदर्भामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला पण त्याचा चित्रपटाच्या कमाईवर फारसा परिणाम झाला नाही.

आणखी वाचा : २०२४ मध्ये होणार साऊथ विरुद्ध नॉर्थ मुकाबला; बॉक्स ऑफिसवर आमने-सामने उभे ठाकणार अल्लू अर्जुन व अजय देवगण

चित्रपटगृहामध्ये सुपरहीट ठरलेल्या या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. मध्यंतरी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार अशी चर्चा रंगली होती. आता याबद्दल एक नवी अपडेट समोर आली आहे. मीडिया रीपोर्टनुसार अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने ‘ओपनहायमर’चे हक्क विकत घेतले असून याच प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

प्रदर्शनाच्या तारखेबद्दल खुलासा झाला नसला तरी यावर्षीच्या सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका अभिनेता सिलियन मर्फीने केली आहे. त्याच्याबरोबरच रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, मॅट डॅमन, एमिली ब्लंट, रामी मलिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Christopher nolan directed oppenheimer movie ott release update avn