अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २- द रुल’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपटाचे निर्मातेही वेळोवेळी चाहत्यांना याबद्दल अपडेट्स देत असतात. सोमवारी ११ सप्टेंबर रोजी ‘पुष्पा २’ची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा हा चित्रपट पुढच्या वर्षी १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

ही गोष्ट फार कमी लोकांना ठाऊक आहे कि पुढच्या वर्षी १५ ऑगस्टला या प्रसिद्ध चंदन तस्कराचा सामना एका दमदार पोलिस अधिकाऱ्याशी होणार आहे. पुढील वर्षी ‘पुष्पा २’ची टक्कर थेट बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाशी होणार आहे. ‘सिंघम अगेन’सुद्धा पुढील वर्षी याच दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण सध्या त्याच्या या चित्रपटाची जोरदार तयारी करत आहे.

आणखी वाचा : ‘जवान’चं कलेक्शन शेअर करत खिलाडी कुमारने केलं किंग खानचं अभिनंदन; ट्वीट करत म्हणाला…

अभिनेता अल्लू अर्जुन याने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा खास लूक पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा अर्धा चेहराही दिसत आहे. त्याच्या हातात सोन्याचे ब्रेसलेट आणि अंगठ्या पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच त्याच्या एका नखावर लाल रंगाची नेलपेंटही पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी त्याच्या बोटांवर रक्ताचे शिंतोडेही उडाल्याचे दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता या घोषणेनंतर ‘पुष्पा २’ हा अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’समोर टिकणार का? याबाबतीत चर्चा सुरू झाली आहे. सध्या एकूणच हिंदी चित्रपटांना आलेले सुगीचे दिवस पाहता हीच गोष्ट पुढल्यावर्षीही पाहायला मिळणार का? अन् हेच चित्र कायम राहिलं तर अल्लू अर्जुन पुन्हा बॉक्स ऑफिसवर इतिहास रचू शकणार का? असे बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. अद्याप या दोन्ही चित्रपटांच्या मेकर्सनी तारीख बदलण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे २०२४ मध्ये १५ ऑगस्टला अल्लू अर्जुन व अजय देवगण हे आमने-सामने उभे ठाकणार असं चित्र सध्या तरी दिसत आहे.