बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती होते. बरेच चित्रपट शूटिंग पूर्ण होऊन प्रदर्शनासाठी सज्ज असतात, पण सेन्सॉर बोर्डाच्या बंदीमुळे ते प्रदर्शित होऊ शकत नाही. बंदी येण्याचं बऱ्याचदा सारखंच कारण असतं ते म्हणजे बोल्ड कंटेंट होय. ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करण्यास मर्यादा नाहीत, त्यामुळे अशा चित्रपटांना प्रदर्शित करण्यासाठी या निर्मात्यांना प्लॅटफॉर्म मिळतो.

ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या सीरिज किंवा चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्डाची परवानगी लागत नाही. त्यामुळे बोल्ड कंटेंट या कारणाने सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित न होऊ शकलेले सिनेमे ओटीटीवर रिलीज करता येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत जे त्यांच्या बोल्ड कंटेंट आणि बोल्ड सीन्समुळे खूप चर्चेत राहिले होते, पण ते लोकांना पाहता आले नाही. ओटीटीच्या आगमनानंतर ही समस्या दूर झाली. कोणते आहेत हे चित्रपट, ज्यावर बंदी घातली गेली पण ते ओटीटीवर पाहता येतील, जाणून घेऊयात.

ब्लॅक फ्रायडे

अनुराग कश्यपच्या ‘ब्लॅक फ्रायडे’ या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांवर आधारित होता. चाहते डिस्ने प्लस हॉट स्टारवर हा चित्रपट पाहू शकतात.

२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…

अँग्री इंडियन गॉडेस

या चित्रपटावर त्यातील कंटेंटमुळे बंदी घालण्यात आली होती. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर चांगलाच वाद निर्माण झाला होता. लोकांनी या चित्रपटाला विरोधही केला. त्याचवेळी सेन्सॉर बोर्डानेही यावर कात्री चालवली. यानंतर निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला. हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता.

अवघ्या २० कोटींचं बजेट अन् कमावले २२५ कोटी, एकही अभिनेत्री नसलेला ‘हा’ सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित

गार्बेज

कौशिक मुखर्जीने दिग्दर्शन केलेल्या ‘गार्बेज’ चित्रपटाची कथा रामी नावाच्या मुलीवर आधारित आहे. चित्रपटात रामीचा बोल्ड एमएमएस लीक होतो, अशी कहाणी आहे. या चित्रपटात भरपूर बोल्ड सीन्स आहेत. या कारणामुळे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र दिलं नाही. चित्रपटात त्रिमला अधिकारी, शतरुपा दास आणि तन्मय धनिया यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

ट्विंकल खन्नाने अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत केला होता डान्स? प्रतिक्रिया देत म्हणाली, “दाऊदने…”

लोएव

हा चित्रपट दोन गे मुलांच्या लव्ह लाइफवर आधारित आहे. समलैंगिक संबंधांवर आधारित या चित्रपटात खूप बोल्ड सीन आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

अनफ्रीडम

बोल्ड कंटेंटमुळे ‘अनफ्रीडम’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. मग हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा सिनेमा पाहू शकता.

NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित

फायर

हा इंडो-कॅनेडियन रोमँटिक ड्रामा चित्रपट १९९६ साली प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये शबाना आझमी आणि नंदिता दास मुख्य भूमिकेत होत्या. समलैंगिक संबंधांवर आधारित या चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट यूट्यूब किंवा इतर काही ऑनलाइन वेबसाइटवर पाहता येईल.