बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर व आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत असलेली ‘द नाईट मॅनेजर’ ही वेब सीरिज १७ फेब्रुवारीला प्रदर्शित झाली. अक्शन थ्रिलर असलेली ही सीरिज ‘द नाईट मॅनेजर’ या इंग्लिश वेब सीरिजचा रिमेक आहे. रंजक व उत्कंठावर्धक कथानकामुळे ही सीरिज प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘थॉर’ फेम हॉलिवूड अभिनेता टॉम हिडलस्टनलाही ‘द नाईट मॅनेजर’ या सीरिजची भूरळ पडली आहे. अनिल कपूर व आदित्यच्या या वेब सीरिजचा टॉमही चाहता झाला आहे. ही वेब सीरिज पाहिल्यानंतर टॉमने आदित्यला व्हिडीओ कॉल केला होता. अभिनेत्याने फोटो शेअर करत याबाबत त्याच्या सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे.

हेही वाचा>> “सेक्सी व्हिडीओ पाठव” म्हणणाऱ्या नेटकऱ्याला मराठी अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली “तुझ्या…”

हेही वाचा>> “चांगला माणूस पण वाईट…” सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने कॉमेडियन कपिल शर्माबाबत केलेलं विधान चर्चेत

टॉम हिडलस्टनबरोबरच्या व्हिडीओ कॉलचा फोटो आदित्यने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या पोस्टला त्याने “ओजी नाईट मॅनेजरने काल आमची सीरिज पाहिली. त्याने या वेब सीरिजचं कौतुकही केलं. अजून काय पाहिजे”, असं कॅप्शन दिलं आहे. टॉमने ‘द नाईट मॅनेजर’ या इंग्लिश वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये तो आदित्य कपूरने साकारलेल्या नाईट मॅनेजरच्या भूमिकेत आहे.

कुठे पाहाल ‘द नाईट मॅनेजर’?

‘द नाईट मॅनेजर’? ही सीरिज फेब्रुवारी महिन्यात हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आली. या वेब सीरिजचे एकूण दोन सीझन असणार आहेत. यातील पहिला सीझन प्रदर्शित झाला असून यात चार एपिसोड आहेत. तर या सीरिजचा दुसरा सीझन जून महिन्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘द नाईट मॅनेजर’ वेब सीरिजमध्ये अनिल कपूर यांनी हत्यारांची तस्करी करणाऱ्या प्रतिष्ठीत व्यावसायिकाची भूमिका साकारली आहे. तर आदित्य रॉय कपूर हॉटेलमधील नाईट मॅनेजरच्या भूमिकेत आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywood actor tom hiddleston video call to aditya roy kapoor after watching the night manager web series kak