95th Academy Awards 2023: ऑस्कर २०२३ सोहळा लॉस एंजेलिसमध्ये सुरू आहे. भारतीय यंदाच्या ऑस्कर अवॉर्डसाठी विशेष उत्सुक आहेत, त्याचं कारण म्हणजे ‘नाटू नाटू’ गाणं होयं. पण याशिवाय भारताला आणखी एक नॉमिनेशन मिळालं होतं आणि भारताने त्यासाठी ऑस्कर जिंकला आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Oscar Awards 2023 Live : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; भारताने कोरले ऑस्कर पुरस्कारावर नाव

‘द एलिफंट व्हिस्पर्स’ला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी आहे. त्यात सोडून दिलेला हत्ती आणि त्याची काळजी घेणारी व्यक्ती यांच्यातील अतूट बंधन दाखवण्यात आले आहे. ‘हॉलआउट’, ‘हाऊ डू यू मेजर अ इयर?’, ‘द मार्था मिशेल इफेक्ट’ आणि ‘स्ट्रेंजर अॅट द गेट’ हे लघुपटही नॉमिनेटेड होते. या सर्वांना मागे टाकत भारतीय लघूपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने पुरस्कार जिंकला आहे. या लघुपटाच्या निर्मात्या गुनीत मोंगा आहेत.

‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही डॉक्युमेंट्री तामिळनाडूमधील मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील एका कुटुंबाचे दर्शन घडवते. यात ते दोन हत्ती दत्तक घेतात आणि त्यांचे संगोपन कसे करतात, हे दाखवण्यात आलं आहे. कार्तिकी गोन्साल्विस यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. एकूण ४१ मिनिटांची ही डॉक्युमेंट्री आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian film the elephant whisperers wins academy award for best documentary short at oscars 2023 hrc