पावसामुळे रेड अलर्ट असल्याने लोक घरात अडकून पडले आहेत. शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पावसामुळे लोकल व इतर सार्वजनिक वाहतूक खोळंबली आहे. तुम्हीही पावसामुळे घरीच असाल व कंटाळा आला असेल तर तुम्ही ओटीटीवर काही चित्रपट व वेब सीरिज पाहू शकता.

या आठवड्यात ओटीटीवर अनेक कलाकृती रिलीज झाल्या आहेत. काही सीरिज व चित्रपट तर ट्रेडिंग आहेत. तुम्ही ते ओटीटीवर पाहू शकता. तसेच काही जुने चित्रपटही तुम्हाला ओटीटीवर पाहता येतील.

वेक अप सिड

रणबीर कपूर व कोंकणा सेन शर्मा यांचा वेक अप सिड हा चित्रपट तुम्ही घरबसल्या पाहू शकता. या चित्रपटात ‘इकतारा’ हे सुंदर गाणं आहे. तसेच रणबीर व कोंकणाची केमेस्ट्री तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. वेक अप सिड प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

अंधेरा

‘अंधेरा’ ही सीरिज १४ ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडीओवर रिलीज झाली. ‘अंधेरा’मध्ये प्रिया बापट, करणवीर मल्होत्रा, प्राजक्ता कोळी आणि सुरवीन चावला प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तसेच वत्सल सेठ, पर्वीन डबास आणि प्रणय पचौरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ही सीरिज तुम्ही पाहू शकता.

माँ

काजोलचा सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर चित्रपट ‘माँ’ १५ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. तुम्हाला हॉरर चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.

द समर आय टर्न्ड प्रिटी

अमेरिकन रोमँटिक ड्रामा सीरिज ‘द समर आय टर्न्ड प्रिटी’ प्राइम व्हिडीओवर ट्रेडिंग आहे. ही सीरिज तुम्ही पाहू शकता.

तेहरान

जॉन अब्राहम, नीरू बाजवा व मानुषी छिल्लर यांचा ‘तेहरान’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी Zee5 वर प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा २०१२ मध्ये दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटांवर आधारित आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे, तुम्ही तो घरबसल्या पाहू शकता.

जब वी मेट

तुम्हाला जुने चित्रपट पाहायला आवडत असतील तर ‘जब वी मेट’ हा रोमँटिक ड्रामा तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. यातील आदित्य व गीतची केमेस्ट्री तुमचं मनोरंजन करेल.

नॉटिंग हिल

९० च्या दशकातील ह्यू ग्रँट आणि ज्युलिया रॉबर्ट्स अभिनीत चित्रपट नॉटिंग हिल तुम्ही पाहू शकता.