OTT Release: ओटीटीमुळे नवनवीन चित्रपट, वेब सीरिज घरच्या घरी पाहता येणे सोपे झाले आहे. ओटीटी असे माध्यम आहे, ज्यावर जगभरात प्रदर्शित होणारा कंटेट पाहता येतो. यामध्ये विविध जॉनर असलेले चित्रपट, वेब सीरिज,मालिका पाहता येतात.
आता ३ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर यादरम्यान ओटीटीवर काय काय पाहता येणार आहे, याबद्दल आज आपण जाणून घेऊ…
१. महारानी सीझन ४
नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होत असलेल्या सर्वोत्तम वेब सीरिजपैकी एक म्हणून महारानीच्या चौथ्या वेब सीरिजकडे पाहिले जात आहे.
यामध्ये हुमा कुरैशी, श्वेता बसु प्रसाद, विपिन शर्मा आणि कुसरुति हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. महारानी वेब सीरिजच्या आधीच्या तीनही सीझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या चौथ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज ७ नोव्हेंबरला ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.
२. बारामुल्ला
आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित बारामुल्ला हा चित्रपट चर्चेत आहे. मानव कौल चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ७ नोव्हेंबर २०२५ ला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
३.बॅड गर्ल
बॅड गर्ल हा तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वर्षा भरत यांनी केले आहे. अभिनेत्री अंजली शिवरामने यामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. ४ नोव्हेंबरला हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.
४. फर्स्ट कॉपी सीझन २
फर्स्ट कॉपीच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. आता याचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ५ नोव्हेंबरला एमएक्स प्लेअरवर ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.
याबरोबरच, ‘थोडे दूर थोडे पास’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये पंकज कपूर, मोना सिंग, कुणाल राय कपूरसह अनेक कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट ७ नोव्हेंबरला झी ५वर प्रदर्शित होणार आहे.
याबरोबरच, ‘द फन्टॅस्टिक फोर: फर्स्ट स्टेप्स’ हा हॉलीवूड चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
