हॉलिवूड अभिनेता टॉम हिडलस्टन हा त्याच्या आयकॉनिक भूमिकेमुळे म्हणजेच ‘लोकी’मुळे चांगलाच चर्चेत आहे. मार्वलच्या चित्रपटात आपली कमाल दाखवल्यावर ‘लोकी’वर बेतलेली एक स्वतंत्र सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. नुकताच या सीरिजचा दूसरा सीझन प्रदर्शित झाला असून याची भारतातही भरपुर चर्चा आहे. याच सीरिजसंदर्भात एक वक्तव्य केल्याने टॉम हिडलस्टन चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकी’ या पात्राच्या नव्या रूपात कोणत्या अभिनेत्याला पाहायला आवडेल याबद्दल विचारणा झाल्यावर टॉमने चक्क बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरुख खानचे नाव घेतले आहे. ‘लोकी’ या भूमिकेत शाहरुख खान अगदी चपखल बसू शकतो असं टॉमने वक्तव्य केल्याने सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे. टॉमने शाहरुख खानचा एक जुना चित्रपट पाहिला असल्याने या भूमिकेसाठी तोच योग्य असल्याचं मत त्याने मांडलं आहे.

आणखी वाचा : मध्यरात्रीचे शोज, तिकीटांची ‘ब्लॅक’मध्ये विक्री; सलमानच्या ‘टायगर ३’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

शाहरुख खानच्या २००२ साली आलेल्या ‘देवदास’ या चित्रपटाचा टॉमने संदर्भ दिला आहे. बॉलिवूड हंगामाशी संवाद साधतांना टॉम म्हणाला, “ही फार जुनी गोष्ट आहे जी मला आजही चांगलीच लक्षात आहे. मी शाहरुख खानचा ‘देवदास’ पहिला होता, हा खूप जुना चित्रपट आहे. आमच्या इथल्या चित्रपटगृहात मी तो चित्रपट पाहायला गेलो होतो आणि फार भारावलो होतो. मी असा चित्रपट तोवर कधीच पाहिला नव्हता.” त्यामुळेच ही भूमिका शाहरुख खानच उत्तमरित्या करू शकतो असा टॉमचा अंदाज आहे.

याबरोबरच ‘लोकी’ या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनला भारतीय प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं त्याचेही आभार टॉमने मानले आहेत. याबद्दल एक खास मेसेजही टॉमने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून शेअर केला आहे. ‘लोकी’ ही एमसीयूच्या चौथ्या टप्प्याशी जोडली जाणारी वेबसीरिज आहे अन् ‘लोकी’ या पात्राची लोकप्रियता समोर ठेवूनच या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. तुम्हाला ही सीरिज ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tom hiddleston says shah rukh khan would be a good variant of loki avn