Superhit South Thriller Action Movie on OTT: सध्या बॉक्स ऑफिसवर ‘कांतारा चॅप्टर १’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा जलवा आहे. ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींहून जास्त कलेक्शन केले आहे. २०२२मधील ब्लॉकबस्टर ‘कांतारा’चा प्रीक्वल प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

‘कांतारा’ तुम्हाला आवडला असेल तर असाच एक चित्रपट ओटीटीवर उपलब्ध आहे. २ तास ४४ मिनिटांचा हा दाक्षिणात्य अॅक्शन-थ्रिलर चित्रपट तुम्ही घरबसल्या पाहू शकता. या चित्रपटाची कथा व रेटिंग दोन्ही ऋषभ शेट्टीच्या कांतारापेक्षा चांगली आहे. हा चित्रपट दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

काय आहे चित्रपटाचं नाव?

२०१८ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे नाव ‘वाडा चेन्नई’ आहे. या सिनेमात अभिनेता धनुष, अभिनेत्री ऐश्वर्या राजेश व अँड्रिया जेरेमियासह अनेक कलाकारांनी काम केलंय. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शन वेत्रिमारन यांनी केलं आहे.

‘वाडा चेन्नई’ ची कथा काय?

‘वाडा चेन्नई’ चित्रपटाची कथा एका प्रतिभावान कॅरम खेळाडूभोवती फिरते, जो परिस्थितीमुळे गुन्हेगारीच्या जगात अडकतो. तो एका माफिया गँगमध्ये सामील होतो, परंतु जेव्हा त्याला कळतं की त्याचाच परिसर उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जात आहे तेव्हा कथेत एक ट्विस्ट येतो. पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.

‘वाडा चेन्नई’ कुठे पाहायचा?

‘वाडा चेन्नई’ हा चित्रपट तुम्ही घरबसल्या पाहू शकता. ‘वाडा चेन्नई’ प्राइम व्हिडीओ व जिओ हॉटस्टार या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ८.४ रेटिंग मिळाले आहे, तर ‘कांतारा’ला ८.२ रेटिंग मिळाले आहे.